देवळं बांधून माणूस उभा राहत नाही, माणसं उभारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत; अर्थसंकल्पावर राजू शेट्टींची प्रतिक्रिया
वीजबिल माफी, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान हे मुद्दे अर्थसंकल्पात दुर्लक्षित झाले आहेत, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं.
मुंबई : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी काल राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू यांनी या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली आहे. अर्थसंकल्प बघितल्यानंतर मी निराश झालोय असं राजू शेट्टी यांनी म्हटलं.
गेल्यावर्षी अर्थसंकल्पातअजित पवार यांनी जाहीर केलं होतं की नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही 50 हजार रुपये देऊ. मात्र या अर्थसंकल्पात त्याचा काहीही उल्लेख केला नाही. कर्जमाफीसाठी जे शेतकरी अपात्र ठरले होते, त्याबाबतही एकही शब्द अजित पवार यांनी काढला नाही. मग अर्थमंत्र्यांना अर्थसंकल्पात केलं काय असा सवाल राजू शेट्टी यांनी विचारला.
Maharshtra Budget 2021 | अतिशय निराशाजनक अर्थसंकल्प : देवेंद्र फडणवीस
देवळं बांधून माणूस उभा राहत नाहीत, माणसं उभारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. वीजबिल माफी, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान हे मुद्दे अर्थसंकल्पात दुर्लक्षित झाले आहेत. यावरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली.
अतिशय निराशाजनक अर्थसंकल्प- देवेंद्र फडणवीस
अर्थसंकल्पातून पूर्ण निराशा झाली. बजेटमधून शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळाली नाही, ठाकरे सरकारची कर्जमाफी ही सर्वात फसवी कर्जमाफी ठरली आहे. वीज बिल माफीबाबतही कोणताही दिलासा दिला नाही. पायाभूत सुविधांबाबत जे प्रकल्प घोषित केले, ते सध्या सुरु आहेत किंवा केंद्र सरकारच्या मदतीने सुरु आहेत. एकीकडे केंद्र सरकारला नावं ठेवायची. पण केंद्र सरकार दिलेल्या भरीव निधीचा उल्लेख करणं टाळलं. हे राज्य सरकारचं बजेट होतं की मुंबई महापालिकेचं? मुंबई मनपा बजेटमधल्याच योजना सरकारने ज्याला राज्य सरकार एकही पैसा देत नाही, त्याही योजना या अर्थसंकल्पात घोषित करण्यात आल्या. मागील सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलेल्या आणि सध्या सुरु असलेल्या योजनांचाच अर्थसंकल्पात उल्लेख केला.
संबंधित बातम्या























