MPSC PSI Result : PSI परीक्षेचा निकाल जाहीर, पुण्यातील अजय कळसकर मुलांत पहिला तर मयुरी सावंतची मुलींमध्ये बाजी
MPSC PSI Exam Result : खेळाडू प्रवर्गातील उमेदवारांना वगळून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हा निकाल जाहीर केला आहे.
मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल (PSI Result) जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील अजय कळसकर याने मुलांमध्ये पहिला क्रमांक पटकावला तर मयुरी सावंत हिने मुलींमध्ये बाजी मारली. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षेचा (2021) हा निकाल असून आयोगाच्या संकेतस्थळावर तो प्रसिद्ध करण्यात आला आहे. खेळाडू प्रवर्गातील निकाल वगळून हा निकाल प्रसिद्ध करण्यात आल्याचं आयोगाने स्पष्ट केलं आहे.
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शिफारस यादी (खेळाडू उमेदवार वगळून) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.https://t.co/hk0iGspIKGhttps://t.co/nnn7N1bZpb
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) May 30, 2024
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हा निकाल जाहीर करताना अंतिम गुणतालिकाही जाहीर केली आहे. त्यामध्ये परीक्षेचे गुण आणि मुलाखतीचे गुण देण्यात आले आहेत. पहिला क्रमांक पटकवलेल्या पुण्यातील अजय कळसकर या उमेदवाराला परीक्षेत 305.50 आणि मुलाखतील 24 असे एकूण 329.50 गुण मिळाले आहेत.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शिफारस यादी (खेळाडू उमेदवार वगळून) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
तक्रारी आल्याने खेळाडू प्रवर्गामध्ये निकाल राखून
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पोलिस निरीक्षक पदासाठी 6 जुलै आणि 17 जुलै 2022 रोजी परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल आता आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये खेळाडू प्रवर्गातून अर्ज भरलेल्या उमेदवारांच्या संबंधित काही तक्रारी आयोगाला प्राप्त झाल्या आहेत. त्याची पडताळणी आयोगाकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे खेळाडू प्रवर्ग सोडून उर्वरित 958 पदांसाठीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
खेळाडू उमेदवारांचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व उमेदवारांना त्यांच्या गुणपत्रिकेतील गुणांची पडताळणी करण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात येईल असं आयोगने स्पष्ट केलं आहे.
राज्यसेवा परीक्षेची तारीख बदलली
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेची तारीख बदलण्यात आली आहे. या आधी ही परीक्षा 6 जून रोजी होणार होती. ती आता 21 जुलै रोजी घेण्यात येणार असल्याचं आयोगाने स्पष्ट केलं आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना ओबीसी प्रवर्गातून अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
ही बातमी वाचा: