(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MPSC Examination Scam : MPSC परीक्षेत बोगस परीक्षार्थी; नांदेड सीआयडीकडून आणखी पाच जणांना अटक
MPSC Examination Scam : एमपीएसी परीक्षेत बोगस परीक्षार्थींकडून परीक्षा दिल्याच्या घोटाळा प्रकरणात नांदेड सीआयडीने आणखी पाच जणांना अटक केली आहे.
MPSC Examination Scam : महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत बनावट उमेदवार परीक्षार्थी म्हणून बसवून फसवणूक केल्याच्या प्रकरणात सीआयडी पथकाने कारवाई केली आहे. नांदेड गुन्हे अन्वेषण विभागाने चौकशी करत दोन अधिकाऱ्यांना अटक केली आहे. गुरुवारी आणि आज केलेल्या कारवाईत आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. सीआयडीने परभणी आणि पुणे या ठिकाणांहून दोघांना आणि नांदेडमधून तीन जण, अशा एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
वर्ष 2016-17 मध्ये बोगस परीक्षार्थी बसवून भ्रष्टाचार केल्याप्रकरणी 35 जणांवर नांदेड जिल्ह्यातील मांडवी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार, महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी अनेक गुन्हे दाखल झाले होते. यातील 33 आरोपी हे सध्या जामीनावर आहेत.
नांदेड सीआयडीने अटक करण्यात आलेला एक आरोपी उमेदवार हा परभणी जिल्हा परिषदेचा महिला आणि बालकल्याण विभागातील पर्यवेक्षीय अधिकारी आहे. या आरोपीचे नाव रवी भिमनवार आहे. तर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात कारकून पदावर असणाऱ्याला अटक केली. या आरोपीचे नाव संदीप पवार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर अटक करण्यात आलेल्या आणखी एका आरोपीचे नाव समजू शकले नाहीत. नांदेड जिल्ह्यातील मांडवी येथे आज तीन जणांना अटक करण्यात आली.
गुरुवारी नांदेड CID ने परभणी आणि पुणे येथे कारवाई केल्यानंतर मुख्य आरोपी प्रबोध राठोडच्या घराची झाडाझडती घेतली. नांदेडमधील मांडवी येथील घरातून विविध कागदपत्रे तपासण्यात आली. त्याशिवाय कुटुंब, नातेवाईकांकडेही चौकशी करण्यात आली असल्याचे समजते. या झाडाझडतीच्या कारवाई दरम्यान आणखी तीन जणांना CID ने ताब्यात घेतलं. मांडवी येथे झालेल्या या कारवाईत पंच म्हणून वनविभागाची मदत CID पथकाने घेतली. या बोगस परीक्षार्थी प्रकरणात आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: