एमपीएससी परीक्षा पुढे ढकला अन्यथा होणाऱ्या नुकसानाला सरकार जबाबदार : खासदार संभाजीराजे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा घेणं म्हणजे कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत भर घालण्याचा प्रकार आहे. ही परीक्षा 200 जागांसाठी होणार आहे.
![एमपीएससी परीक्षा पुढे ढकला अन्यथा होणाऱ्या नुकसानाला सरकार जबाबदार : खासदार संभाजीराजे MPSC exam postponed otherwise the government is responsible for the damage says MP Sambhaji Raje एमपीएससी परीक्षा पुढे ढकला अन्यथा होणाऱ्या नुकसानाला सरकार जबाबदार : खासदार संभाजीराजे](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/08024941/Sambhaji-Raje-Speech.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : रविवारी राज्यभरात होणाऱ्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकला अन्यथा त्यादिवशी राज्यभरात जी परिस्थिती निर्माण होईल याला राज्य शासन जबाबदार असेल असा इशारा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारला दिला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना संभाजीराजे म्हणाले की, राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही संख्या नियंत्रणात अजूनही येतं नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा घेणं म्हणजे कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत भर घालण्याचा प्रकार आहे. ही परीक्षा 200 जागांसाठी होणार आहे. आणि या परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल 2 लाखांच्या घरात आहे. जर यामध्ये कुठल्या विद्यार्थ्यांला कोरोनाची लागण झाली तर त्याची सरकार जबाबदारी घेणार आहे का? जर ही परीक्षा झाली तर मराठा समाजातील कार्यकर्ते प्रत्येक केंद्रावर जाऊन परीक्षा केंद्र फोडून टाकतील. आज 2 लाख विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न असताना देखील सरकार परीक्षा घेतं असेल तर यामागे राजकीय षडयंत्र तर नाही ना याची देखील शक्यता नाकारता येतं नाही. हे षडयंत्र आम्ही होऊ देखील देणार नाही.
नवी मुंबईतील माथाडी भवन येथे राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाचे समनव्यक आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला खासदार छत्रपती संभाजीराजे उपस्थित होते. यावेळी बोलताना संभाजीराजेंनी ही भूमिका मांडली. यावेळी राज्यभरातील काही एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा नाही झाली तर आमची वयोमर्यादा संपेल अशी भीती देखील व्यक्त केली. याला उत्तर देताना संभाजीराजे यांनी अशा विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांची वयोमर्यादा वाढवून द्या अशी देखील सरकारकडे मागणी केली.
बैठकीकडे पुन्हा उदयनराजेची पाठ
राज्यभरात मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षण प्रश्नी मराठा समाजात विविध गट निर्माण झाले आहेत. यामध्ये इडब्ल्यूएस आरक्षणाच्या बाजूने एक गट आहे तर दुसरा गट एसइबीसीचं आरक्षणचं मिळायल हवं यासाठी आग्रही असल्याचं पाहिला मिळत आहे. हे गट मोडून सर्व नेत्यांची एकच मागणी व्हावी यासाठी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे प्रमुख नरेंद्र पाटील यांनी आज नवी मुंबईतील माथाडी भवन येथे राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीचं नेतृत्व खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे भोसले यांनी करावं अशी आग्रही मागणी होती. परंतु या बैठकीकडे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा पाठ फिरवल्याचं पहिला मिळालं. याआधी नाशिक आणि पुणे येथे विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण विचार मंथन बैठीकच आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी देखील खासदार उदयनराजे यांना निमंत्रण देण्यात आलं होतं परंतु उदयनराजे यांनी त्यादेखील बैठकांकडे पाठ फिरवली होती.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)