एक्स्प्लोर
Advertisement
बापट साहेब, साताऱ्यातून खासदारकी लढवा, मी माघार घेतो : उदयनराजे
उदयनराजेंनी बापटांना साताऱ्यातून खासदारकी लढवण्याची ऑफर देऊन उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच दिला. अर्थात, त्यांनी आपल्या मिश्किल शैलीत हे विधान केले, मात्र त्यामागील किस्साही त्यांनी सांगितला.
सातारा : राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या बेधडक शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. कधी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना उत्तर देणं असो वा, सरकारला इशारा असो, ते कधीही हातचे राखून बोलत नाही, अशी त्यांची ख्याती आहे. साताऱ्यातील आजच्या कार्यक्रमातही उदयनराजेंच्या वक्तृत्त्वाची खास स्टाईल दिसून आली.
इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेच्या सातारा शाखेच्या उद्घाटन प्रसंगी अन्न व नागरीपुरवठा मंत्री गिरीश बापट आणि खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते. यावेळी उदयनराजेंनी बापटांना साताऱ्यातून खासदारकी लढवण्याची ऑफर देऊन उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच दिला. अर्थात, त्यांनी आपल्या मिश्किल शैलीत हे विधान केले, मात्र त्यामागील किस्साही त्यांनी सांगितला.
“बापट साहेबांच्या येण्यामुळे मन प्रफुल्लित होते. एक प्रकारचा उत्साह निर्माण होतो. मी त्यांना गाडीतून येताना सांगितले, बस्स झाला महाराष्ट्र, तुम्ही आता दिल्लीत या. म्हणजे तुमचा सहवास जास्त लाभेल. बापटसाहेबांची इच्छा असेल तर त्यांनी साताऱ्यातून उभे रहावे, मी माघार घेईन.”, अशी जाहीर ऑफरच उदयनराजेंनी गिरीश बापटांना दिली.
गिरीश बापट यांनीही या कार्यक्रमात बोलताना उदयनराजेंबद्दल आदर व्यक्त केला. शिवाय, या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यामागचं कारणही सांगतिले.
गिरीश बापट म्हणाले, “या कार्यक्रमाला खासदार उदयनराजे आहेत, हे समजल्यामुळे मी पुण्याचा कार्यक्रम रद्द करून साताऱ्याच्या कार्यक्रमाला खास आलो. कारण व्यासपीठावर उदयनराजेंसोबत असणे, यासाठी भाग्य लागते. पूर्वी आम्ही अनेकदा एका व्यासपीठावर होतो. आज या निमित्ताने महाराज येथे आहेत. मला जुनी पोटनिवडणूक आणि खासदारकीची निवडणूक आठवते. उदयनराजे असले, की आमच्यासारख्या कार्यकर्त्यांला उत्साह येतो. त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देतो.”
एकंदरीत गिरीश बापट आणि उदयनराजे भोसले यांच्या भाषणांनी या कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
बॉलीवूड
Advertisement