एक्स्प्लोर
शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांच्यातील मतभेद मिटण्याची शक्यता
आमदारकी-खासदारकीसाठी या घराण्याचं वलय मोठ आहे, त्याला गालबोट लागता कामा नये अशी भूमिका शिवेंद्रराजेंनी व्यक्त केली आहे. यावरुनच आमदार शिवेंद्रराजे आणि खासदार उदयनराजे यांच्यातील मतभेद मिटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सातारा : साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. मिटण्याचे संकेत खुद्द छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले आहेत. मला फक्त आमदारकीत रस आहे. त्यामुळे मी विधानसभेची तयारी करत आहे, असं शिवेंद्रराजेंनी म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी उदयनराजेंसोबतचे सर्व वाद मिळटल्याचे संकेच दिले आहेत. छत्रपतींचं घराणं एकच आहे. त्या घराण्याच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल, अशी कोणतीही कृती माझ्याकडून घडणार नाही, अशा शब्दांमध्ये त्यांनी उदयनराजेंसोबतचा मतभेद मिटण्याचे शिवेंद्रराजेंनी म्हंटलं आहे. आमची दोन घराणी नाहीत तर छत्रपतींचं एकच घराणं आहे. फरक फक्त एवढाचं की उदयनराजेंच घराण थोरल. घरातील जेष्टांमुळेच आमचे मनोमिलन झाले असल्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी सांगितले. तसेच माझं म्हणण एवढचं आहे की एकाच घराण्यात वाद नको. माझा राजकारणातील निर्णय लोक करणार आहेत. मरेपर्यंत कोणीच आमदार, खासदार किंवा मंत्री राहत नाही. घराण्याचं वलय हे मरेपर्यंत राहणारं आहे, त्याला धक्का लागू नये अशी इच्छा शिवेंद्रराजेंनी व्यक्त केली आहे. मला आमदारकीमध्ये आवड असून मला खासदारकीत रस नसल्याचे शिवेंद्रराजे भोसलेंनी बोलून दाखवले. पवार साहेबांच्या इच्छेखातर मी आमदारकीला उभ राहिलो आणि वडिलही पवारसाहेबांमुळेच खासदारकीला उभे राहिले. मी आमदारकीला माझ्या पध्दतीने उभ राहणार असून मी त्याची तयारी सरु केली असल्याचं शिवेंद्रराजेंनी सांगितले. पवार साहेब सांगतिल तो निर्णय मी घेणार आहे. मी राजकारणी नसून मी लोकांमध्ये मिळून मिसळून राहणारा नेता आहे. मी लोकांमध्ये मिळून मिसळून राहिलो तर माझ टिकणार असल्याचेही शिवेंद्रराजेंनी बोलून दाखवले. देवाची सेवा म्हणून मी पारायणात जेवन वाढले आणि मी हे खूप दिवसांपासून करत आलो आहे. पूर्वी सोशल मिडीयाचा वापर करत नव्हतो मात्र आता मार्केटींगचं विश्व आहे. त्यामुळे मी आता सोशल मिडीयाचा वापर करायला लागलो. साताऱ्यातील जावळी येथील एका मंदिर सोहळ्याच्या कार्यक्रमप्रसंगी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे एकत्र आले होते. साताऱ्यातील मनोमिलनाबाबत उदयनराजेंनींच वेगळी भूमिका घेतली. मात्र मनोमिलनाबाबत माझी वेगळी भूमिका नव्हती. उदयनराजेंनीच मनोमिलनाबाबत उत्तर द्याव. माझी तर इच्छा आहे की आपल्या वादातून घराण्याला कोणताही धक्का लागू नये. आमदारकी-खासदारकीसाठी या घराण्याचं वलय मोठ आहे, त्याला गालबोट लागता कामा नये अशी भूमिका शिवेंद्रराजेंनी व्यक्त केली आहे. यावरुनच आमदार शिवेंद्रराजे आणि खासदार उदयनराजे यांच्यातील मतभेद मिटण्याची शक्यता नाकारता येत नाही. EXCLUSIVE | खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्यातील वाद मिटणार | एबीपी माझा संबंधित बातम्या साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंची धावती भेट VIDEO : दारुच्या दुकानासमोर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे आमने-सामने डॉल्बी, गणपती विसर्जन वादात आमदार शिवेंद्रराजे भोसलेंची उडी ‘मैं हूँ डॉन’ गाण्यावर आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी धरला ठेका! मी खलनायक असेन तर उदयनराजे प्रेम चोप्रा: शिवेंद्रराजे भोसले उदयनराजे, शिवेंद्रराजे समर्थक आरोपींचा रुग्णालयात लुंगी डान्स कुठेही पळा, अटक करणारच : IG विश्वास नांगरे- पाटील मी हातात बांगड्या भरल्या नाहीत, आ. शिवेंद्रराजेंचं खा. उदयनराजेंना खुलं आव्हान
आणखी वाचा























