एक्स्प्लोर

सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र सरकारला नपुंसक म्हटल्याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे; संजय राऊतांची बोचरी टीका

Sanjay Raut on Maharashtra Government: राज्य सरकारबाबत सर्वोच्च न्यायालयाचं (Supreme Court) निरीक्षण विचार करण्यासारखं आहे, राज्य सरकारचा जीव खोक्यात आहे, असं संजय राऊत म्हणालेत.

Sanjay Raut Press Conferance: संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhaji Nagar) तणावाला राज्य सरकारच जबाबदार, दंगली घडवण्याचं काम बनावट शिवसेना (Shiv Sena) करतेय, असा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. तसेच गृहमंत्रालय अस्तित्वात आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. सरकारचा (Maharashtra Government)  जीव खोक्यात आहे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला फटकारलं आहे. त्यासंदर्भात बोलताना राज्य सरकारबाबत सर्वोच्च न्यायालयाचं (Supreme Court) निरीक्षण विचार करण्यासारखं आहे. त्यामागे तर आम्ही नाही, असं म्हणत संजय राऊतांनी सरकारवर घणाघात केला आहे. 

सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारवर केलेल्या टिप्पणीवर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "महाराष्ट्र सरकारला नपुंसक म्हटलं आहे. जे सराकरला गेले काही महिन्यांपासून सरकारबद्दलच जनता बोलते आहे. नपुंसक, बिनकामाचे सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. आणि आम्ही तर नाही म्हटले हे सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे. हे जसे सरकारमध्ये आलं. त्यावरून हे बोललं जात आहे. आजवर सर्वोच्च न्यायालय असे कोणत्याच राज्याबद्दल बोललं नाही, पण महाराष्ट्र सरकार बद्दल बोलते आहे. जे आम्ही म्हणतो की, सरकार अस्तित्वात नाही."

"विशेषतः मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं स्वतः गुलाम बनून वागत आहेत. डोळे उघडू का? बोलू का बोलू नको ? वाचू का नको वाचू का? का हे जे चालले आहे. त्यालाच न्यायालयानं म्हटलं आहे. जातीय दंगली वाढाव्या तेढ राहावी, असं ते काम करत आहे. आम्ही आभार मानतो की, सर्वोच्च न्यायालयनं हे म्हटलं. जनतेचे डोके ठिकाणावर आहे, आता तरी सरकारचं डोकं ठिकाणावर आलं पाहीजे.", असं संजय राऊत म्हणाले. 

पाहा व्हिडीओ : Sanjay Raut Full PC : गृहमंत्रालय अस्तित्वात आहे का? दंगली घडवण्याचं काम बनावट शिवसेना करतेय

 देवेंद्र फडवणीस निराश, वैफल्यग्रस्त परिस्थितीत काम करत आहेत : संजय राऊत 

संजय राऊत म्हणाले की, "राज्यात अशांतता निर्माण करणं, हा या सरकारचा एकमेव हेतू आहे. आज दंगली होत आहेत. मुळात राज्यात गृहमंत्रालय अस्तित्वात आहे की नाही, हा प्रश्न आहे. देवेंद्र फडवणीस निराश, वैफल्यग्रस्त परिस्थितीत काम करत आहेत. याची कारणं शोधावी लागतील. त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी सातत्याने नाराजी दिसते. काल संभाजीनगरमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली. त्याला राज सरकार जबाबदार आहे. हे सरकारचं अपयश आहे. राज्यात असं वातावरण निर्माण व्हावं, ही सरकारची इच्छा आहे, त्यासाठी मिंधे गटाच्या अनेक टोळ्या काम करते आहेत."

काही दिवसांतच महाविकास आघाडीची सभा संभाजीनगरमध्ये होणार आहे. त्यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, "महाविकास आघाडीच्या सभा दणक्यात होतील. तुम्ही खेड आणि मालेगाव पाहिलं आता पुढली सभा पाचोऱ्यात होणार आहे. तेव्हा तुम्ही पाहालच.." तसेच, मंत्री भेटत नाही, सरकारचं अस्तित्व जाणवत नाही. म्हणून तर सर्वोच्च न्यायालयाला नपुंसक म्हणावं लागतं. आम्ही तर त्यांना खोके सरकार जे म्हणतो, या सरकारचा जीव खोक्यात आहे. बरोबर सर्वोच्च न्यायालयही तेच म्हणतंय, असंही संजय राऊत म्हणाले. 

लाकूड तुम्ही देत आहात पण हातोडा आम्हीच मारलाय : संजय राऊत 

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरासाठी महाराष्ट्रातून सागवान रवाना झालं आहे. यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, "लाकूड महाराष्ट्रातून नेत आहात. ते भाजपच्या मालकीचं नाही. महाराष्ट्राचे योगदान लढ्यात कायम आहे. महाराष्ट्राचे योगदान म्हणजे, शिवसेना पक्ष प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी दिलेला लढा... लाकूड तुम्ही देत आहात पण हातोडा आम्हीच मारलाय."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nanded  : नांदेडच्या परांडात अंधश्रद्धेच्या कारणावरून 7 वर्षीय चिमुरडीचं अपहरणShivsena Melava : दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्याची तयारी, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आयोजनWalmik karad Audio Clip : कराडसंबंधीत सनी आठवले नावाच्या तरुणानं प्रसिद्ध केली धक्कादायक ऑडिओ क्लिपEknath Shinde Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेत नव नियुक्तीसाठी मुलाखती होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Rohit Pawar : पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
Embed widget