अमरावतीत खासदार-आमदार एकाच बाईकवर, निकालानंतरचा नवनीत कौर राणा यांचा व्हिडीओ व्हायरल
खासदार आणि आमदार एकाच बाईकवर असल्याने अमरावतीत या व्हिडीओची चर्चा होत आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनीच हा व्हिडीओ शूट केला आहे.
अमरावती : लोकसभा निवडणुकीत युवा स्वाभिमानी आघाडीच्या नवनीत कौर राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव करत संसदेत एन्ट्री मिळवली. त्यादिवसापासून नवनीत कौर राणा चर्चेत आहेत.आता नवनीत कौर राणा यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. 23 मे रोजी निकालानंतर पती आमदार रवी राणा आणि नवनीत कौर राणा यांचा बाईकवर फिरतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
निकालाच्या दिवशी नवनीत कौर राणा आणि रवी राणा बाईकवरुन आपल्या घरापासून ते बडनेरा रोड येथील निमानी गोडाऊन येथील मतमोजणी केंद्रावर रात्री 10 वाजता बाईकवर जाऊन सर्टिफिकेट घेतलं. त्यावेळी त्यांच्याभोवती बाईकवर फिरणाऱ्या कार्यकर्त्यांचा गराडा होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
खासदार आणि आमदार एकाच बाईकवर दिसत असल्याने अमरावतीत या व्हिडीओची चर्चा होत आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनीच हा व्हिडीओ शूट केला आहे.
अमरावती मतदारसंघात नवनीत कौर राणा यांचा 37,266 मतांची विजय झाला. नवनीत कौर राणा यांना 5,01,327 एवढी मते मिळाली. तर शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांना 4,64,061 मते मिळाली.
आणखी वाचा
VIDEO | लोकसभा विजयानंतर नवनीत कौर राणा यांच्याशी बातचीत