एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

कोकणाचा विकास थांबवणाऱ्या मुख्यमंत्र्यांना देवी पावणार नाही : नारायण राणे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कोकण प्रेम खोटं आहे. उगाच कोकण प्रेम दाखवयाचं, आमच्या ग्रामपंचायत सदस्याला जेवढी माहिती आहे, तेवढीही माहिती मुख्यमंत्र्याला नाही, अशी टीका नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली.

सिंधुदुर्ग :  उद्धव ठाकरे यांनी कोकणाच्या विकासाला काय योगदान दिलं ते सांगावं. मुख्यमंत्र्यांचं कोकण प्रेम खोटं आहे. पर्यटन निधी, विकास कामांना दिलेली स्थगिती उठवावी. आधी कोकणासाठी जाहीर केलेला निधी द्यावा, मग आम्ही कोकणाच्या विकासकामांच्या बैठकीला जाऊ, असं खासदार नारायण राणे यांनी म्हटलं आहे. उगाच कोकण प्रेम दाखवयाचं, आमच्या ग्रामपंचायत सदस्याला जेवढी माहिती आहे, तेवढीही माहिती मुख्यमंत्र्यांना नाही, अशी टीका नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली.

मुख्यमंत्र्यांनी गणपतीपुळे आणि भराडी देवीचं दर्शन घेतलं, मात्र कोकणाचा विकास थांबवणाऱ्या मुख्यमंत्र्यांना देवी पावणार नाही, असं नारायण राणे यांनी म्हटलं. मी मंत्री असताना तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्ह्याला भरघोस निधी दिला होता. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा मुख्यालयात फक्त दोन मंत्र्यांची मंत्रिमंडळाची बैठक घेतली. यातून कोकणाच्या विकासाला किती निधी मिळतो हे पाहावं लागेल. पैसे काढून देण्याचं ज्ञान मुख्यमंत्र्यांना अवगत नाही. कोकणातील विकासकामांना दिलेली स्थगिती उठवावी, एवढं केलं तरी खूप आहे, असं नारायण राणेंनी म्हटलं.

नाणार प्रकल्पाबाबत बोलताना नारायण राणे यांनी म्हटलं की, नाणार प्रकल्पाच्या जवळ जायचा प्रयत्न आहे. नाणार प्रकल्पात तडजोड झाली आहे. मुख्यमंत्री तडजोड करायला या पदावर आले आहेत. नाणार प्रकल्पामागे अर्थकारण लपलंय, त्यामुळे कामं थांबवायची आणि कंत्राटदारांना बोलवायचं हे काम चाललं आहे, असा आरोप नारायण राणेंनी केला. मुख्यमंत्री रत्नागिरीत गेल्यावर नाणार संदर्भात ना समर्थकांना भेटले, ना विरोधकांना भेटले. याआधी रत्नागिरीत येऊन नाणार होऊ देणार नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. मात्र काल सामनामध्ये आलेल्या जाहिरातीवरुन उद्धव ठाकरे दुतोंडी असल्याची टीका नारायण राणे यांनी केली.

महाविकास आघाडीचं सरकार राज्याच्या दृष्टीनं योग्य नाही. सरकारचा प्रत्येक दिवस मागे जाण्यासारखा आहे. सरकारमधील तीन पक्षांचे अंतर्गत प्रश्न चव्हाट्यावर येत आहेत. जनतेच्या हिताचं हे सरकार नाही. मुख्यमंत्री मंत्रालयात किती तास बसतात? काय केलं त्यांनी आतापर्यंत, नुसते दौरे काढायचे. मंत्रालयात सगळीकडे भ्रष्टाचाराची दुकाने चालत आहेत. सर्व कामांना स्थगिती दिली जात आहे. मी नेहमीच चांगल्याला चांगलं बोलत असतो. चागलं काम केलं तर मी कौतुक करणार. चांगलं काम केलं तर त्यांना जेवायला देखील बोलवेन, असं नारायण राणे म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मुख्यमंत्री कोण विषय बाजूलाच राहिला , दिल्लीच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंच्या बॉडी लँग्वेजची जोरदार चर्चा
शुन्यात हरवलेली नजर, पडलेले खांदे, चेहऱ्यावर मलूल भाव; एकनाथ शिंदेंच्या बॉडी लँग्वेजची जोरदार चर्चा
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Maharashtra New CM : दिल्लीत 2 तास बैठक, अमित शाहांशी चर्चा; महायुती काय ठरलं?Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: मुख्यमंत्री कोण विषय बाजूलाच राहिला , दिल्लीच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंच्या बॉडी लँग्वेजची जोरदार चर्चा
शुन्यात हरवलेली नजर, पडलेले खांदे, चेहऱ्यावर मलूल भाव; एकनाथ शिंदेंच्या बॉडी लँग्वेजची जोरदार चर्चा
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
Embed widget