एक्स्प्लोर

'बिअरबार उघडे, धार्मिक स्थळे बंद, आघाडी सरकार दारूड्यासारखे वागतंय' : इम्तियाज जलिल

बिअरबार उघडे ठेवून धार्मिक स्थळे बंद ठेवणारे आघाडी सरकार दारुड्यासारखे वागत असल्याची टीका एमआयएमचे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केली आहे.

औरंगाबाद : बिअरबार उघडे ठेवून धार्मिक स्थळे बंद ठेवणारे आघाडी सरकार दारुड्यासारखे वागत असल्याची टीका एमआयएमचे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केली आहे. सर्व सामाजिक धार्मिक स्थळे सुरू केली जावीत अशी भूमिका घेणारे इम्तियाज जलील औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट सुरू झाले आहेत, त्यापूर्वीच दारू विक्रीही सुरू करण्यात आलेली आहे. मात्र हे सरकार सर्व धर्माचे धार्मिक स्थळे उघडायला तयार नाही. यासाठी काही दिवसापूर्वी आंदोलन केले होते, त्यावेळी मात्र त्याला धार्मिकतेचा रंग देण्यात आला .ज्या मंदिराच्या प्रश्नावरुन शिवसेना राजकारणात आली, मोठी झाली, यश मिळालं. मात्र त्यांचं सरकार सत्तेत असताना त्यांना मात्र मंदिरांचा विसर पडला आहे का? असा प्रश्न देखील इम्तियाज जलील यांनी केला आहे.

खासदार  इम्तियाज जलील म्हणाले की, माझी भूमिका बदललेली नाही, धार्मिक स्थळं उघडण्यासाठी केलेल्या आंदोलनाला वेगळे रूप देऊन काही जणांनी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे आंदोलन मला थांबवावे लागले. जातीय तणाव निर्माण होऊ नये हा माझा हेतू होता. सरकारने हा प्रश्न ना पूर्वी गंभीरतेने घेतला ना आज घेत आहे. त्यामुळे मंदिराबाहेर फुलं, फळं विकणाऱ्या अनेकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.  एकीकडे बियर बार उघडे केले आहेत, मद्य विक्रीही सुरू आहे. सरकार मधील तीन पक्षांना दारू जवळची वाटत आहे, मात्र धार्मिक स्थळ महत्त्वाचे वाटत नाहीत. हे गेल्या अनेक वर्षांपासून जातीय राजकारण करत आहेत. त्यांना मात्र धार्मिक स्थळाबाबत आस्था का नाही? असा  प्रश्नदेखील इम्तियाज जलील यांनी विचारला.

जलील यांच्या मागणीवर चंद्रकांत खैरे यांचं मत धार्मिक स्थळाबाबत राजकारण केले तर ते हाणून पाडू असं खैरे म्हणाले. अनलॉकच्या  प्रक्रियेत बऱ्याच बाबी सुरू झाल्या आहेत. सरकार धार्मिक स्थळ उघडण्याचा विचार करत आहे. येत्या काही दिवसात धार्मिक स्थळ उघडलेली आपल्याला पाहायला मिळतील. येत्या काळात राज्य शासन धार्मिक स्थळ उघडण्याबाबत निर्णय घेईल. मंदिरांबाबत आम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे तो आम्ही घेऊ. धार्मिक स्थळाबाबत प्रश्न करुन जलील यांनी राजकारण करू नये. मशिदी उघडण्याबाबत केलेल्या आंदोलनानंतर औरंगाबादच्या खासदारांना त्यांच्या मौलवींना सुनावलं आहे. त्यामुळे  इम्तियाज जलील यांनी मौलवी काय सांगतात याकडे लक्ष दिलं पाहिजे असं खैरे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: अनिल देसाई नरेश म्हस्केंच्या दिशेने धावले...; शिवसेनेच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर जोरदार ड्रामा; नेमकं काय घडलं?
अनिल देसाई नरेश म्हस्केंच्या दिशेने धावले...; शिवसेनेच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर जोरदार ड्रामा; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Embed widget