एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

इम्तियाज जलील यांच्या पत्राला खा. चंद्रकांत खैरेंचं उत्तर

इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या हिंसाचारानंतर खासदार चंद्रकांत खैरेंना पत्र लिहिलं होतं. त्याला खैरेंनी उत्तर दिलं आहे.

औरंगाबाद : शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी एमआयएमचे औरंगाबादमधील आमदार इम्तियाज जलील यांच्या पत्राला उत्तर दिलं आहे. इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या हिंसाचारानंतर खासदार चंद्रकांत खैरेंना पत्र लिहिलं होतं. औरंगाबादच्या दंगलीनंतर शहरात शांतता प्रस्थापित करण्याचं सोडून खासदार खैरेंनी धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम केलं, हे लोकप्रतिनिधींना शोभण्यासारखं नाही. त्यामुळे आता एकत्र येऊन शहरात शांतता प्रस्थापित करु असं खुलं पत्र औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील लिहलं. दंगल घडवणाऱ्या काही मूठभर लोकांमुळे शहराला बदमान करणं योग्य नाही. शहराला शांतता हवी आहे, त्यामुळे यापुढे एकत्र येऊन प्रयत्न करु, असं या आवाहन त्यांनी केलं होतं. चंद्रकांत खैरे यांचं पत्र इम्तियाज भाई सर्व प्रथम आपणास सप्रेम जय महाराष्ट्र .. खरं तर आपल्या पत्राला उत्त्तर देणार नव्हतो परंतु एक खोटी गोष्ट १० वेळा लोकांना सांगितली तर लोकांना ती खरी वाटते हे लॉजिक आपणास माहित आहे. त्यात आपण पत्रकार आहात म्हणुन आपण त्या लॉजिक चा पुरेपुर वापर करीत सोशल मिडिया मध्ये पत्र प्रपंच केलात... सर्व प्रथम एक सच्चा हिंदू म्हणुन.. सन्माननीय बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणुन... आणि त्यानंतर संभाजीनगरचा जबाबदार खासदार म्हणुन आपल्या पत्रावर जरा आपल्याशी बोलावं म्हणुन हे पत्र !!! तर आपण माध्यमांमध्ये म्हणालात घडलेली दंगल खैरेंनी त्यांच्या राजकीय फायद्या करीता घडविली.... तर आपण मला वैयक्तिक पत्र न पाठवता जाहीर पणे पत्र लिहिले ते राजकीय स्वार्थापोटी अथवा सहानुभूती मिळविण्यासाठीचं तर लिहिले ना... ? मला येऊन भेटला असतात अथवा फोन केला असतात तरी तुम्ही हे विषय मला बोलू शकला असतात परंतू त्याचा गव गवा होणार नव्हात ना ? यातच आपली राजकीय महत्वकांक्षा दिसते... आपण आपल्या पत्रात म्हणालात मी सर्व हिंदूचे रक्षण करणार. मी हिंदूचा नेता आहे. मी हिंदूचा आमदार होतो. मी हिंदुचा खासदार आहे. या माझ्या वक्तव्यामुळे म्हणे संवेदनशील मानवतावादी औरंगाबादी नागरीक म्हणुन तुम्हाला प्रचंड वेदना झाल्या तर मला सांगा १५ मिनिट पुलिस हटादो किसमे हिम्मत है बता देंगे असं ओवेसी जाहीर सभेत बोलतात तेव्हा तुम्ही तुमचं मन कुठे गहाण ठेवलं होतत ? आजही तुमच्या पक्षाचे एमआयएम चे वेगवेगळे नेते बाहेरुन येऊन इथे आमखास मैदानावर चिथावणीखोर भाषणं करतात तिथे उपस्थित असलेले लाख-दिड लाख मुस्लीम समाजातील लोक त्यांना सहमत होऊन टाळयांचा कडकडाट करतात तेव्हा मग काय ते नेते तिथे संस्कारवर्ग चालवत असतात का ? आणि मी हिंदू आहे हिंदू आमदार आहे हिंदुच रक्षण करणार असं बोललो तर त्यात तुमच्या मनाला वेदना का होतात ? मी रक्षण करणार असं बोललो.... ते का बोललो ? ज्यांच्यावर हल्ला होत असतो रक्षण त्याचं करायचं असतं ना ? जेव्हा समोरुन मिरची पुडया, पेट्रोल बॉम्ब, तलवारी, लोखंडी सळया, दगडफेक करण्यासाठी कश्मिर मेड गलोरी इतकी सगळी तयारी करुन ठेवुन आक्रमण होतं तेव्हा माझ्या सारख्या बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकाने हातात बांगडया घालून तुमच्या सोबत शांती मोर्चा काढत तमाम दंगलग्रस्त हिंदूना दंगलीत जळत ठेवायच होत का ? अहो ते आमदार, खासदार, प्रतिष्ठा या सगळयांपेक्षा बाळासाहेबांनी दिलेलं शिवसैनिक हे पद माझ्या करिता परमोच्च आहे. आणि हिंदुत्व रक्षण हे त्या पदाच अंतिम ब्र्रीद आहे. ते कर्तव्य आहे आमचं. ते आयुष्यभर होणारच आहे. आणि मला आपण जे समझदारी चा डोस पाजण्याचा प्रयत्न करीत आहात तोच डोस जर दंगल सुरु असतांना तमाम मुस्लीम नेते रात्रभर सगळ्या मोहल्ल्यांमध्ये ५-१० हजार तरुणांना घेवून त्यांच्या समोर जो संस्कारवर्ग चालवून व्यवस्थित चिथावणीखोर संस्कार दंगल पेटवत होते त्यांना पाजला असता तर मला हे पत्र लिहीण्याची वेळ आपल्यावर आली नसती. आपण म्हणालात, मी सर्व धर्माच्या सर्व लोकांचा खासदार आहे. हो आहेच. मलाही ते मान्यच आहे परंतु म्हणून मी माझं हिंदुत्व रक्षणाच परम कर्तव्यापासुन दूर पळू शकत नाही. हिंदू कधीच स्वतःहून कोणाशी पंगे घ्यायला जात नाहीत आणि गेलेही नव्हते.. मग कोणी पंगे घ्यायला आल्यास त्याला गुलाबाची फुलं वाहायची का ? तशी पध्दत आम्हा शिवसैनिकांमध्ये नसते. तसे संस्कारच आमच्यावर मा. शिवसेना प्रमुखांनी करुन ठेवलेत. हिंदुवर कोणीही हल्ला केल्यास त्याचा चोख उत्त्तर मिळणारच. तेव्हा हल्ला करण्याचा धर्म कोणता आहे हयाच्याशी आम्हाला देण घेणचं आम्हाला नसत. त्या पेक्षा कोणी हल्ला करुच नका ? सर्वानीच गुण्या गोविंदाने राहा.. आमचे देखील तेच म्हणणे आहे.. सर्वे भवन्तु सुखिन : .. आपण पुढे म्हणता छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे आपण आपल्या सर्व रयतेसाठी केलेल्या कार्यानं आपण चांगले हिंदु आहात हे दाखविले पाहिजे, अशी इथल्या नाकरिकांची इच्छा आहे. तर आपल्या माहिती साठी आपला इतिहास कमजोर असल्या कारणाने सांगतो कि साक्षात परम आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील स्वराज्यावर हल्ला करणाऱ्यांना पायघड्या घातल्या नव्हत्या त्यांचा योग्य तो बंदोबस्त चं केला होता.. मग आम्ही देखील तर तेच करत आहोत ना ? आपण पुढे म्हणता शहर शांत करणे हि आपली लोकप्रतिनिधी या नात्याने पहिली जबाबदारी होती. का ? आपण लोकप्रतिनिधी नाही आहात का ? आपण हल्ला होऊच नसता दिला तर ही वेळ का आली असती ? एकीकडे आपल्या पक्षाचे नगरसेवक आणि नेते दंगल पेटवतात आणि वर आम्हांला ती शांत करायची विनंती करतात हे दुतोंडी राजकारण नाही का ? आम्ही दंगल केलीच नाही तुमच्या पक्षाच्या लोकांकडून ती पेटविल्यावर आम्ही आमच्या पध्दतीने ती शांतच केली. आणि लोकप्रतिनिधी म्हणूनच बोलायचं तर १९९० ला सर्वप्रथम शिवसेनाप्रमुखांच्या आशिर्वादाने आणि या शहरातील जनतेच्या पाठबळावर मी या शहरात हिंदु आमदार म्हणुन निवडून आलो त्यानंतर १९९५ ला परत निवडुन आल्या नंतर मा शिवसेनाप्रमुखांनी मला कॅबीनेट मंत्रीपद देवून या शहराचं पालकमंत्री केलं. आपण ४ वर्षापुर्वी आमदार झालात त्यावेळी माझा ३ वेळा खासदार म्हणुन माझा कार्यकाळ पूर्ण करुन झाला होता. सध्या माझी चौथी टर्म सुरु आहे. इतक्या कालखंडात मी शहरात किती दंगली घडविल्या ? या कालखंडात एकही दंगल शहरात मी होऊ दिली नाही.. तुमच्या हैद्राबादच्या निजाम मेड कट्टरतावादी पक्षाचा शहरात प्रवेश झाल्यावरचं दंगली कशा काय होतात ? दंगल करणारे मुठभर एकदोन हजार हिंदु किंवा मुस्लिम असतील पण औरंगाबाद शांत रहावे, हिंदु व मुस्लीमांनी गुण्यागोविंदाने व प्रेमाने रहावे असे वाटणारे लाखों हिंदु व मुस्लिम आहेत हे खरे नव्हे का ? असं तुम्ही म्हणता तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या दगडफेक करणारा मुस्लीम समाजाचा गट एकदोन हजार नाही तर १० हजारापेक्षा जास्त होता आणि पूर्ण तयारीनिशी होता.. हिंदु वसाहतीमध्ये सर्व जण झोपेत असतांना रात्रीच्या शांततेत पद्धतशीरपणे हा दंगलीचा डाव खेळल्या गेला होता. आणि हिंदु-मुस्लीम आजवर येथे प्रेमानेच तर आजवर राहत होते ना ? दंगली या आधी शिवसेनेचा शहरात प्रवेश झाल्यानंतर आम्ही होउâच दिलेल्या नव्हत्या त्या आज तुमचा कट्टर मुस्लीम पक्ष शहरात आल्यावरच कशा काय होत आहेत? स्वामींच्या आईस्क्रिमच्या दुकानाबद्दल आपण बोलतात. दुकान जाळणारे तुमच्याच पक्षाचे कार्यकर्ते आणि वरुन तुम्हीच बांधून देताय हे राजकारण जनतेला कळत नाही असं आपल्याला वाटत कां ? तसं असेल तर लवकर जागे व्हा.. जनता है.. सब जानती है .. आणि विकासाबद्दल बोलत आहात तेव्हा एक लक्षात घ्या २० वर्ष झाले मी खासदार आहे त्या पूर्वी असलेलं संभाजीनगर आणि आजचं संभाजीनगर यांची जरा तुलना करुन पहा.. प्रत्येक सामान्य व्यक्तीचा आलेला फोन मी स्वतः उचलतो.. अर्ध्या रात्री त्यांच्या संकटकाळी त्यांच्या मदतीसाठी धावून जातो. हे मोठेपणा म्हणुन सांगत नाही तर ते माझं कर्तव्यच आहे असं मी समजतो आणि तसे संस्कारच मा. शिवसेना प्रमुखांचे माझ्यावर आहेत. आजही मा. शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरेंच्या सुसंस्कृत तथा संयमी नेतृत्वाखाली आमचा पक्ष ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करतो हे आमचं तत्वचं आहे, स्वतः दंगली पेटविण्याचे उद्योग कधी आम्ही केले नाहीत कारण आमचं पक्ष नेतृत्वच सुसंस्कृत आहे आणि संबध महाराष्ट्राने ते अनुभवलं आहे. संभाजीनगर मधील जनता देखील ते अनुभवत आहे. आणि म्हणुनच त्या जनतेच्या आशिर्वादाने मी आज खासदार आहे. पण त्याच वेळी तुमच्या पक्षप्रमुखांचे चिथावणीखोर संस्कारवर्ग संबध हिंदुस्थान ऐकतो. म्हणुन तम्हाला नम्र विनंती आहे लोकं सगळं पाहत असतात तुमच्या सारखं दुतोंडी राजकारण फार काळ टिकत नसत. बाकी आपण सुज्ञ आहात आपण हैद्राबाद इम्पोर्टेड कट्टरपंथीय एमआयएमची विचारधारा नाकारत शहरात शांतता ठेवाल अशी आशा व्यक्त करतो तसेच ती शांतता ठेवण्यासाठी कधीही अर्ध्या रात्री मला हाक मारा मी आपल्या सोबत असेल ही देखील हमी देतो.  जय महाराष्ट्र !!! आपलाच हक्काचा खासदार चंद्रकांत खैरे इम्तियाज जलील यांचं पत्र
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रियाAditi Tatkare Win Vidhan Sabha Election | राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंचा दणदणीत विजय ABP MajhaRaju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Vidhan Sabha Constituency Election Result 2024: राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
Embed widget