Amol Kolhe : अमोल कोल्हेंनी दिलेला शब्द पाळला, अखेर शर्यतीत घोडीवर झाले 'स्वार'
आज अखेर खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe ) यांनी दिलेला शब्द पाळला आहे. कोल्हे आज बैलगाडा शर्यतीत घोडीवर 'स्वार' झाल्याचे पाहायला मिळाले.

Amol Kolhe : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिलेला शब्द अखेर खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी आज सत्यात उतरवला आहे. कोल्हे आज बैलगाडा शर्यतीत घोडीवर 'स्वार' झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी उपस्थित असलेल्या जनसमुदायाने एकच जल्लोष केला. आज पुणे जिल्ह्यातील निमगाव दावडी येथील घाटात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोल्हे यांनी उपस्थिती दर्शवीत घोडीवर स्वार झाले.

निमगाव दावडी हा खंडोबाच्या मानाचा हा घाट आहे. आज बैलगाडा मालक या मानाच्या घाटात स्वखुशीने त्यांच्या सर्जा-राजाची जोडी उतरवल्या आहेत. तिथेच आज खासदार अमोल कोल्हे त्यांचा शब्द पूर्ण केला आहे.

शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव (Shivaji Adhalrao Patil) यांनी याच मुद्द्यावरून अमोल कोल्हे यांना 11 फेब्रुवारीला छेडलं होतं. प्रचारात दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी आढळरावांनी त्यांच्या गावातील घाटात येण्याचं आमंत्रण कोल्हे यांना दिले होते. आढळराव पाटील यांनी कोल्हेंना खुलं आव्हान दिलं होतं. बैलगाडा शर्यत सुरू होताच, पहिल्या बारीत घोडीवर बसेन, असे आश्वासन कोल्हे यांनी दिले होते. या कोल्हेंच्या आश्वासनावरून आढळराव पाटलांनी त्यांना अनेकदा घाट दाखवला. पुढे देखील ते अनेकदा कोल्हेंना या मुद्यावरुन कोंडीत पकडू शकतात, हे लक्षात आल्यानं पहिल्या बारीत नाही तर नाही निदान मानाच्या घाटात तरी घोडीवर बसण्यासाठी कोल्हे आज तयार झालेत. कोल्हेंची बारी पाहायला बैलगाडा शौकिनांना देखील उत्सुकता लागलेली होती. अखेर ती शौकिनांची इच्छा कोल्हेंनी पूर्ण केली आहे.
दरम्यान, कोरोना नियमांचे पालन करणाऱ्या सर्व बैलगाडा शर्यत मालकांचे तसेच शौकिनांचे अमोल कोल्हाे यांनी आभार मानले आहेत. देशातील पहिला खासदार आज बैलगाडा घाटात घोडीवर बसल्याचे देशाने पाहिल्याचे मला पत्रकारांनी सांगितले. अमोल कोल्हे घोडीवर बसल्याचे कौतुक नाही तर बैलगाडा शर्यत ही राज्यात, देशात लोकप्रिय झाली पाहिजे असे कोल्हे यावेळी म्हणाले.
या सर्व शर्यतींचे डॉक्युमेंटेशन होणार आहे. ते सर्व खंडपाठीसमोर मांडले जाईल, त्यावेळी विजय आपलाच होणार असल्याचा विश्वास अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला. आजची बैलगाडा शर्यत ही सर्व माध्यमांनी सगळीकडे लाईव्ह दाखवली. त्यामुळे निमगावचा घाट संपूर्ण राज्यात लाईव्ह गेला असल्याचे कोल्हे म्हणाले. देशातील पहिला खासदार आज बैलगाडा घाटात घोडीवर बसल्याचे देशाने पाहिले आहे. यामध्ये अमोल कोल्हे घोडीवर बसल्याचे कौतुक नाही. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी शर्यत देशात, राज्यात लोकप्रिय झाली पाहिजे. तिची लोकप्रियता आणखी वाढवायची आहे. त्यामाध्यमातून बैलगाडा शर्यत आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायची असल्याचे कोल्हे यांनी सांगितले.
पाहा व्हिडीओ: अमोल कोल्हेंनी बारी मारली
Before You Go
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
महत्त्वाच्या बातम्या






















