एक्स्प्लोर

अमेरिकेहून सुट्टीवर आलेल्या सुनेची सासूकडून हत्या

मुलाला आपल्यापासून दूर नेल्याचा राग मनात धरुन अमेरिकेहून सुट्टीवर आलेल्या सुनेची सासूने हत्या केल्याची घटना वसईत घडली आहे. हत्येनंतर सासूने स्वतःहून पोलीसांकडे आत्मसमर्पण केले.

वसई : शहरात सासूने सुनेची निघृण हत्या केल्याची घटना घडली आहे. वसईतील प्रतिष्ठीत कुंटुबात हे हत्याकांड घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सून आणि मुलगा हे अमेरिकेला राहतात. महिनाभराच्या सुट्टीनिमित्त भारतात आले होते. हत्येनंतर सासू स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाली होती. सासूला सून आवडत नसल्याने ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. मृत 32 वर्षीय रिया माने हिचा पती रोहन माने हा अमेरिकेत इंजिनिअर पदावर नोकरी करतो. तर, रिया ही स्वतः नर्सची नोकरी करते. या दोघांचा सहा वर्षापूर्वी विवाह झाला होता. त्यांना एक लहानशी मुलगी ही आहे. एक डिसेंबरला रोहन आपली पत्नी आणि लहानग्या मुलीसोबत वसईला आपल्या आई-वडिलांकडे आला होता. रोहनचं लग्न झाल्यापासून रिया ही सासू आनंदीला आवडत नव्हती. अधून मधून या दोघांमध्ये वादविवाद ही होत होते. त्यातच आपल्या मुलाला आपल्याकडून लांब नेलं हाही राग सासूच्या मनात रटमटत होता. आज(15 डिसेंबर)सकाळी रियाची सासू आरोपी आनंदी माने हिने रियाच्या बेडरुममध्ये जावून, जवळच्याच फ्लॉवर पॉटने झोपेलेल्या रियाच्या डोक्यावर प्रहार करुन तिला ठार मारुन टाकलं. त्यानंतर स्वतः माणिकपूर पोलीस ठाण्यात जावून, आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी सासू आनंदी माने हिला ताब्यात घेतले आहे. बेडरुममध्ये रक्ताच्या थारोळ्यातील रियाचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. माने यांचं सदन कुंटुब आहे. मुलगा रोहन माने अमेरिकेला असतो. रोहनचे वडील स्वतः वन विभागात अधिकारी पदावर कार्यरत होते. सध्या रिटायर्ड झाले होते. सर्व काही व्यवस्थित चाललेलं. घटनेच्या दिवशी रियाचे सासरे आपल्या नातीला घेवून, बाहेर गेले होते. तर रियाचा छोटा दिर आणि त्याची पत्नी दुसऱ्या बेडरुममध्ये झोपले होते. डिसेंबरच्या अखेरपर्यंत रिया आणि रोहन हे पुन्हा आपल्या अमेरिकेला जाणार होते. मात्र, हे असं घडलं. आरोपी सासूला पोलिसांनी अटक केली असली तरी, घरचे असं कसं झालं याच दु:खात आहेत. Nirbhya case | निर्भया हत्याकांड प्रकरणातील दोषींना 16 डिसेंबरला फाशी? | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget