देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


1. Maharashtra Election Survey: शिंदे फडणवीस युती की, ठाकरेंची शिवसेना? 2024 च्या निवडणुकांमध्ये कोणाची सरशी? सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष


Maharashtra Election News: वर्षभरापासून महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) एकापाठोपाठ एक भूकंप पाहायला मिळत आहे. आधी शिवसेनेतील (Shiv Sena) प्रबळ नेते समजल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) बंड करत ठाकरेंची साथ सोडली आणि भाजपची (BJP) कास धरली. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड करत थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. वाचा सविस्तर 


2. Panchayat Election : पश्चिम बंगालमध्ये ग्रामपंचायतींवर तृणमूल काँग्रेसचं वर्चस्व, 34901 जागांवर तृणमूलचा तर 9719 जागांवर भाजपचा विजय


West Bengal Panchayat Election Result : पश्चिम बंगालमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी पार पडली. यामध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने बाजी मारली आहे. सर्वाधिक ग्रामपंचायती तृणमूल काँग्रेसनं जिंकल्या आहेत.  राज्यातील एकूण 3,317 ग्रामपंचायतींपैकी 2,634 ग्रामपंचायती तृणमूल काँग्रेसने  जिंकल्या आहेत. भाजपने 220 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत, तर डाव्या आघाडीने 41 आणि काँग्रेसने 5 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. वाचा सविस्तर 


3. India Rain Update: पुरामुळं उत्तर भारतात गंभीर स्थिती, अनेक भागात जनजीवन विस्कळीत; उत्तराखंडला 413 कोटींची मदत


Rain Update : सध्या उत्तर भारतात (North India) मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. नद्यांना पूर आल्यामुळं या ठिकाणची परिस्थिती गंभीर बनली आहे. हिमाचल प्रदेशसह उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली उत्तर प्रदेश या राज्यांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, या पावसामुळं हिमाचल प्रदेशात आत्तापर्यंत 88 जणांचा मृत्यू झाला आहे.  तर 16 जण बेपत्ता असून, 100 जण जखमी झाले आहेत. वाचा सविस्तर 


4. Delhi Yamuna Flood : दिल्लीत तब्बल 45 वर्षांनंतर यमुनेच्या पाण्याची पातळी 208 मीटरच्याही पुढे; पूरस्थिती पाहता सरकार सतर्क


Delhi Yamuna Flood : देशाची राजधानी दिल्लीत पावसामुळे यमुनेच्या पाण्याची पातळी सतत वाढत आहे. तब्बल 45 वर्षांनंतर येथील नदीच्या पाणी पातळीने 208 मीटरचा टप्पा ओलांडला आहे. पूरस्थिती पाहता दिल्ली सरकार सतर्क आहे. वाचा सविस्तर 


5. Chandrayaan 3 : इस्रो तिसऱ्या चंद्र मोहिमेसाठी सज्ज! शास्त्रज्ञांची टीम तिरुपतीच्या दर्शनाला, चांद्रयान-3 प्रक्षेपणाची तालीम पूर्ण


Chandrayaan-3 ISRO Moon Mission : भारताच्या (India) महत्वाकांक्षी चंद्रमोहिमेला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने चंद्रमोहिमेबाबत मोठी अपडेट दिली आहे. इस्रो तिसऱ्या चंद्र मोहिमेसाठी (Moon Mission) सज्ज असून चांद्रयान-3 प्रक्षेपणाची तालीम पूर्ण झाल्याची माहिती इस्रोनं दिली आहे. वाचा सविस्तर 


6. IND vs WI 1st Test: डोमिनिका कसोटीचा पहिला दिवस टीम इंडियाच्या नावे; अश्विनची फिरकी, तर रोहित-यशस्वीची भागिदारी विंडिजवर भारी


India vs West Indies Dominica Test 1st Day: टीम इंडिया (Team India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यात बुधवारी डोमिनिकामध्ये बुधवारी खेळवण्यात आलेल्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्याला काल (बुधवारपासून) सुरुवात झाली. सामन्याचा पहिल्या दिवस पूर्णपणे टीम इंडियाच्या बाजूनं होता. वाचा सविस्तर 


7. Elon Musk : मस्क देणार ChatGPT ला टक्कर, xAI नवीन आर्टिफिशल इंटेलिजंस कंपनी लाँच


Elon Musk xAI Company : ट्विटर (Twitter) आणि टेस्ला (Tesla), स्पेसएक्स (SpeceX) या कंपन्यांचे सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) यांनी आता आर्टिफिशल इंटेलिजेंस (Artificial Intelligence) क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. वाचा सविस्तर 


8. 13th July In History: पावनखिंडचे घनघोर युद्ध, अभिनेते निळू फुले यांचे निधन, मुंबईत साखळी बॉम्बस्फोट; आज इतिहासात...


13th July In History: आजचा दिवस इतिहासाच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. स्वराज्याच्या इतिहासातील महत्त्वाची घटना असलेली पावनखिंडीची लढाईदेखील आजच्या दिवशी झाली. या लढाईत बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल मावळे यांनी प्राणांची आहुती दिली. तर, मुंबईत आजच्या दिवशी साखळी बॉम्बस्फोट झाले होते. तर, ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांचा आज स्मृतीदिन आहे. वाचा सविस्तर 


9. Horoscope Today 13 July 2023 : वृषभ, तूळसह 'या' राशीच्या लोकांना मिळणार आर्थिक लाभाची संधी; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य


Horoscope Today 13 July 2023 : आज गुरुवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, वृषभ राशीच्या लोकांनी आज रागावर नियंत्रण ठेवावं, वृश्चिक राशीच्या लोकांचे त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले जाईल. मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी आजचा गुरुवार कसा राहील? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर