West Bengal Panchayat Election Result : पश्चिम बंगालमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी पार पडली. यामध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने बाजी मारली आहे. सर्वाधिक ग्रामपंचायती तृणमूल काँग्रेसनं जिंकल्या आहेत.  राज्यातील एकूण 3,317 ग्रामपंचायतींपैकी 2,634 ग्रामपंचायती तृणमूल काँग्रेसने  जिंकल्या आहेत. भाजपने 220 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत, तर डाव्या आघाडीने 41 आणि काँग्रेसने 5 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत.


तृणमूल काँग्रेसने 34,901 जागा जिंकल्या


सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमधील एकूण 63,229 ग्रामपंचायत जागांपैकी 34,901 जागा जिंकल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगानं याबाबतची माहिती दिली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर भाजप आहे. भाजपने 9,719 जागांवर विजय मिळवला आहे. तर डाव्या आघाडीने 3,083 ग्रामपंचायतीच्या जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसने 2,542 जागा जिंकल्या असून, इतरांना 2,896 जागा मिळाल्या आहेत. 214 ग्रामपंचायतींमध्ये अपक्ष उमेदवारांसह इतरही आघाडीवर आहेत. तब्बल 203 ग्रामपंचायतींमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. उर्वरित जागांची मतमोजणी सुरु आहे.


ममता बॅनर्जींचा भाजपवर निशाणा


ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मतदारांचे आभार मानले. तसेच भाजपवर टीकाही केली. भाजप सतत खोटे बोलत असल्याचे बॅनर्जी म्हणाल्या. मी काही गुन्हा केला असेल तर जनता मला शिक्षा करु शकते. जनतेने मला आशीर्वाद दिला असल्याचे बॅनर्जी म्हणाल्या. आपण महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंद यांसारख्या महान व्यक्तींचे अनुयायी असल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या. 


264 पंचायत समित्यांवर तृणमूल काँग्रेसचं वर्चस्व


341 पंचायत समित्यांपैकी तृणमूल काँग्रेसने 264 पंचायत समित्या जिंकल्या आहेत. तर भाजपने नऊ पंचायत समित्या जिंकल्या आहेत. तर डाव्या आघाडीने तीन पंचायत समित्या जिंकल्या आहेत. इतरांनी नऊ पंचायत समित्या जिंकल्या आहेत तर चार पंचायत समित्यांमध्ये त्रिशंकू स्थिती आहे.


जिल्हा परिषदेच्या 674 जागांवर तृणमूल काँग्रेसचं वर्चस्व 


एकूण 928 जिल्हा परिषदेच्या जागांपैकी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने पक्षाने 674 आणि भाजपने 21 जागा जिंकल्या आहेत. डाव्या आघाडीने दोन जिल्हा परिषदेच्या जागा जिंकल्या आहेत तर काँग्रेसने 6 जागा जिंकल्या आहेत. एक जागा अपक्ष उमेदवाराला गेली. मतमोजणी सुरू असल्याने उर्वरित जागांचे निकाल येणे बाकी आहे. टीएमसीने राज्यातील सर्व 20 जिल्हा परिषदा जिंकल्या आहेत.


महत्त्वाच्या बातम्या:


Mamata Banerjee : पश्चिम बंगाल सरकारचा मोठा निर्णय, पोलीस भरतीसाठीची वयोमर्यादा 27 वरुन 30 वर्षापर्यंत वाढवली