Chandrayaan-3 ISRO Moon Mission : भारताच्या (India) महत्वाकांक्षी चंद्रमोहिमेला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने चंद्रमोहिमेबाबत मोठी अपडेट दिली आहे. इस्रो तिसऱ्या चंद्र मोहिमेसाठी (Moon Mission) सज्ज असून चांद्रयान-3 प्रक्षेपणाची तालीम पूर्ण झाल्याची माहिती इस्रोनं दिली आहे. 14 जुलै रोजी चांद्रयान-3 अवकाशात झेपावणार आहे. चांद्रयान-3 प्रक्षेपणाची तयारी पूर्ण झाली आहे. या महिमेअंतर्गत पहिल्यांदाच अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. भारताचा आधी एक प्रयत्न अयशस्वी झाला होता. त्यामुळे या मोहिमेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार चांद्रयान-3
चांद्रयान-3 हा इस्रोच्या चंद्रमोहिमेतील तिसरा टप्पा आहे. याआधी चांद्रयान-1 आणि चांद्रयान-2 प्रक्षेपित करण्यात आलं होतं. चांद्रयान-2 द्वारे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा चंद्राच्या चांद्रयान-3 द्वारे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून तेथील परिस्थितीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न असणार आहे.
इस्त्रो (ISRO) शास्त्रज्ञांची टीम चांद्रयान-3 चे लघु मॉडेल घेऊन तिरुपती मंदिरात प्रार्थना आणि दर्शन करण्यासाठी पोहोचली.
इस्रोची महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिम
आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून चांद्रयान-3 (Chandrayaan 3) 14 जुलै रोजी दुपारी 2.35 वाजता प्रक्षेपित केलं जाईल. चांद्रयान-3 लाँच व्हेईकल मार्क-3 (LVM3) रॉकेटद्वारे आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा (Sriharikota) येथील सतीश धवन स्पेस सेंटर (Satish Dhawan Space Centre) मधून प्रक्षेपित करण्यात येईल. LVM3 मधील प्रॉपेलंट मॉड्यूल 'लँडर' आणि 'रोव्हर'ला चंद्राभोवती 100 किमीच्या कक्षेत नेईल. यानंतर चांद्रयान 3 अलगदपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. ही मोहीम 2019 चांद्रयान-2 मोहिमेचा पुढचा टप्पा आहे. 2019 मध्ये चांद्रयान-2चं लँडर आणि रोव्हर चंद्रावर सॉफ्ट-लँड करू शकलं नव्हतं, त्यामुळे मोहीम अयशस्वी झाली होती.
चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास
चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्यात येणार आहे. चांद्रयान 3 च्या मदतीने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून वैज्ञानिक उपकरणांच्या साहाय्याने त्याच्या पृष्ठभागाचा अभ्यास केला जाईल. भविष्यातील मानवी चंद्र मोहिमेच्या दृष्टीने ही मोहिम फार महत्त्वाची आहे. इस्रोने बुधवारी ट्विट करत माहिती दिली की, 24 तासांची 'लाँच रिहर्सल' पूर्ण झाली आहे. चांद्रयान-3 ही मोहीम चांद्रयान-2 साठी पाठपुरावा करणारी मोहीम आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग आणि परिभ्रमण करून पूर्ण क्षमतेने काम करणं अपेक्षित आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :