Elon Musk xAI Company : ट्विटर (Twitter) आणि टेस्ला (Tesla), स्पेसएक्स (SpeceX) या कंपन्यांचे सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) यांनी आता आर्टिफिशल इंटेलिजेंस (Artificial Intelligence) क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. एलॉन मस्क यांनी स्वत:ची नवीन आर्टिफिशल इंटेलिजंस कंपनी (AI Company) लाँच केली आहे. ही कंपनी चॅटजीपीटी (ChatGPT) सारख्या AI कंपन्यांना टक्कर देईल. एलॉन मस्क यांनी एक्सएआय (xAI) या एआय कंपनीची घोषणा केली आहे. xAI कंपनीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) क्षेत्रातील अनुभवी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांनी गुगल, मायक्रोसॉफ्ट, डीपमाइंड यासारख्या बड्या कंपन्यांमध्ये काम केलं आहे.


मस्क यांची नवीन आर्टिफिशल इंटेलिजेंस कंपनी


एलॉन मस्क यांनी बुधवारी xAI एआय कंपनीची घोषणा केली. मस्क ओपन AI कंपनीचे सहसंस्थापक देखील होते. त्यामुळे मस्क यांची xAI ही कंपनी चॅटजीपीटी सारख्या आर्टिफिशल इंटेलिजंस कंपन्यांसाठी मोठं आव्हान मानलं जात आहे. मस्क यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, विश्वाचं खरं स्वरूप समजून घेण्यासाठी नवीन AI कंपनी xAI सुरू करत आहे. कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, मस्क आणि त्यांची टीम शुक्रवारी, 14 जुलै रोजी थेट ट्विटर स्पेस चॅटमध्ये यासंदर्भातील अधिक माहिती देणार आहेत.


xAI कंपनी ChatGPT ला देणार टक्कर


मस्क यांनी xAI कंपनीतील अधिकाऱ्यांची फार कसून निवड केली आहे. हे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना डीपमाईंडमधील अल्फाकोड आणि ओपनएआय सारख्या कंपन्यांमध्ये कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. मस्क हे ओपन एआय (Open AI) कंपनीचे सह-संस्थापक होते. टेस्ला कंपनीसोबतच्या मदभेदांमुळे त्यांनी ओपन एआय कंपनी सोडली. त्यानंतर आता त्यांनी स्वत:ची एआय कंपनी लाँच केली आहे.


मस्क OpenAI चे सह-संस्थापक


मस्क याआधीही एका मोठ्या एआय कंपनीचा भाग होते. मस्क यांनी डिसेंबर 2015 मध्ये सॅम ऑल्टमन, ग्रेग ब्रॉकमन, इल्या सुत्स्केव्हर, जॉन शुलमन आणि वोज्शिच झारेम्बा यांच्यासह OpenAI कंपनीची स्थापना केली होती. OpenAI ही कंपनी चॅट GPT तयार करते. टेस्लासोबतचा वाद टाळण्यासाठी मस्क यांनी 2018 मध्ये OpenAI कंपनी सोडली.


सध्याच्या मोठ्या AI कंपन्या :


1. ओपनएआयची चॅटजीपीटी (OpenAI ChatGPT)


2. गुगलची बार्ड (Google Bard)


मार्च 2023 रोजी xAI कंपनीची स्थापना 


एप्रिलमध्ये पहिल्यांदाच xAI बद्दल माहिती समोर आली होती. त्यानंतर वॉल स्ट्रीट जर्नलने अहवालात माहिती दिली होती की, एलन मस्क यांनी 9 मार्च 2023 रोजी XAI नावाची नवीन कंपनी स्थापन केली आहे. xAI कंपनीचं मुख्यालय यूएसएच्या टेक्सासमधील नेवाडा येथे आहे. मस्क हे  xAI कंपनीचे एकमेव संस्थापक आहेत. 


संबंधित इतर बातम्या : 


देशातील पहिलं AI विद्यापीठ महाराष्ट्रात, व्हर्च्युअल रिॲलिटीसह भविष्यातील तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रम