एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भाविकांच्या विरोधानंतरही 1 जानेवारीपासून विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदी
नवीन वर्षापासून पंढपूरच्या विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. भाविकांचे मोबाईल ठेवण्यासाठी लॉकरची व्यवस्था मंदिर प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
पंढरपूर : भाविकांच्या विरोधानंतरही उद्यापासून(1जानेवारी)विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांचे जवळपास लाखभर मोबाईल ठेवता येतील अशा अडीच हजार लॉकरची व्यवस्था मंदिर समितीने उभारली आहे. प्रत्येक मोबाईलला दोन रुपये याप्रमाणे शुल्क भाविकांना समितीकडे द्यावे लागणार आहेत. दर्शनावरुन परत आल्यावर हे मोबाईल या ठिकाणाहून भाविकांना परत मिळणार आहेत.
आज सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी हजारो पर्यटक पंढरीत दाखल झाले असून विठ्ठल मंदिराची दर्शन रांग चंद्रभागेच्या पात्रापर्यंत पोचली आहे. या भाविकांच्या स्वागतासाठी मंदिर समितीच्या नवीन भक्तनिवासात फुले आणि फुग्यांच्या साहाय्याने आकर्षक सजावटीचे काम सुरू आहे. सर्व भक्त निवास इमारती पर्यटकांनी ओव्हरपॅक झाल्या आहेत.
1 जानेवारीपासून विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदी -
उद्या म्हणजेच 1 जानेवारी 2020 पासून विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीचा निर्णय काटेकोरपणे राबविण्यात येणार आहे. त्यामुळे आता मंदिराजवळील दर्शन मंडपात मोबाईल लॉकरच्या सुविधेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या ठिकाणी विठुरायाच्या दर्शन रांगेत उभारण्यापूर्वी भाविकाला आपले मोबाईल या लॉकरमध्ये आणून पावती घ्यावी लागणार आहे. मोबाईल ठेवण्यासाठी आपले ओळखपत्र आवश्यक असणार असून त्याशिवाय भाविकाला मोबाईल ठेवता येणार नाहीत. मोबाईल ठेवल्यावर भाविकाला पावती दिली जाणार असून यासाठी प्रति मोबाईल दोन रुपये सेवा शुल्क द्यावा लागणार आहे. दर्शनाला कितीही वेळ लागला तरी पुन्हा मोबाईल घेताना त्याला वेगळे शुल्क द्यावे लागणार नाही. यात्रा काळात देवाच्या दर्शनाला 18 ते 20 तासांपर्यंत वेळ लागत असल्याने ही सुविधा समितीने दिली आहे. नवीन वर्षाचे पहिले काही दिवस संपल्यावर पुन्हा गर्दीचा ओघ कमी होणार असल्याने समितीला या व्यवस्थेतील त्रुटी शोधून त्या दूर करता येणार आहेत.
मोबाईल बंदीच्या निर्यणाला विरोध -
मंदिर समितीने पूर्वी सुरक्षेच्या कारणावरून मंदिरात मोबाईल बंदीचा निर्णय घेतला होता. त्यावेळी मोबाईल लॉकरच्या नावाने पैसे वसूल करण्यात येत असल्याचे आरोप झाले होते. या प्रकाराविरोधात वारकरी संप्रदाय आणि भाविकांनी आवाज उठविल्यावर मंदिरातील मोबाईल बंदी उठविण्यात आली होती. आता ही बंदी पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा - शिर्डीत मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत काय? तपास करा, हायकोर्टाचे आदेश
Ram Mandir | असं असेल अयोध्येतील नवीन राम मंदिर | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
मुंबई
करमणूक
Advertisement