'आण रे तो मलम',...अन् राज ठाकरेंनी कार्यकर्त्याच्या सुजलेल्या हातावर स्वत: मलम लावलं
Raj Thackeray Viral Video : एका कार्यकर्त्याचा हात सुजला असताना मनसे नेते राज ठाकरेंनी स्वत: त्याला मलम लावला. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
मुंबई : राज ठाकरेंच्या नावावर ज्या नेत्यांनी आमदारकी मिळवली त्या नेत्यांनी नंतर मनसे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत अनेक नेत्यांनी राज ठाकरेंची साथ सोडली पण तळागाळातला कार्यकर्ता अजूनही त्यांच्यासोबत आहे. यामागचं कारण काय असा अनेकांना प्रश्न पडतो. त्याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये स्वत: राज ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्याच्या सुजलेल्या हाताला मलम लावताना दिसून येत आहे.
आज मनसेची एक महत्त्वाची बैठक मुंबईत सुरु होती. या बैठकीला सर्व महत्वाचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बैठक सुरु असताना अचानक मनसे कामगार नेते डॉ. मनोज चव्हाण यांचा हात दुखू लागला. त्यांच्या हाताला सूज आल्याने त्यांना वेदना होत होत्या. त्यामुळे डॉ. मनोज चव्हाण यांना बैठकीतून निघून जाण्याची वेळ आली होती. मात्र ही बाब राज ठाकरेंच्या लक्षात येताच त्यांनी डॉ. मनोज चव्हाण यांची आपुलकीने विचारपूस केली.
त्यानंतर राज ठाकरेंनी स्वत: डॉ. मनोज चव्हाण यांच्या सुजलेल्या हातावर मलम लावला. या वेळी डॉ. मनोज चव्हाण हे भारावून गेल्याचं दिसत होतं. राज ठाकरेंनी अगदी घरच्या व्यक्तीप्रमाणे काळजी घेतल्याने डॉ. मनोज चव्हाण यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
आतापर्यंत एखादा कार्यकर्ता आपल्या नेत्यासाठी काहीही करु शकतो याची प्रिचिती सर्वांनाच अनेकदा आली आहे. पण राज ठाकरेंच्या या कृत्यामुळे नेताही आपल्या कार्यकर्त्यासाठी, त्याची काळजी घेण्यासाठी काहीही करु शकतो हे स्पष्ट झालंय.
महत्त्वाच्या बातम्या :
- Raj thackeray video : अमरावतीसारखा प्रयत्न महाराष्ट्रात पुन्हा झाल्यास सोडायचं नाही, राज ठाकरे यांचा इशारा
- मुलाचं नाव ठेवण्याचा परभणीच्या दाम्पत्याचा आग्रह, राज ठाकरेंनी एका मिनिटात नाव ठेवलं!
- रुपाली पाटील यांचा मनसेला 'जय महाराष्ट्र', पक्ष सोडण्यावर मौन सोडले, म्हणाल्या...