यवतमाळच्या वणी शहरात मनसेची राज गर्जना, चंद्रपूर पाठोपाठ वणीतही उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता
Raj Thackeray in Yavatmal : यवतमाळच्या वणी येथे मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, आजच्या या सभेत विधानसभेच्या उमेदवाराची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.
Yavatmal News : यवतमाळच्या वणी येथे मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवाजी चौकामध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे. काल चंद्रपूर (Chandrapur) येथे झालेल्या सभेत विधानसभेच्या दोन उमेदवारांची घोषणा राज ठाकरेंकडून करण्यात आली. त्यामुळे आज वणी येथे आयोजित या सभेत देखील विधानसभेच्या उमेदवाराची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. वणी हे सुरुवातीपासूनच मनसेचा (MNS) गड राहिलेला आहे. दरम्यान, वणी या ठिकाणी मनसेचा उमेदवार या पूर्वी निवडून आला असल्याने त्या अनुषंगाने राज ठाकरे आज कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांची संबोधित करणार आहे. दरम्यान या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलतात हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.
चंद्रपूर पाठोपाठ वणीतही उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता
आगामी विधानसभा निवडणुकीच्या (VidhanSabha Election 2024) पार्श्वभूमीवर मनसे (MNS)पक्ष देखील मैदानात उतरला असून त्या अनुषंगाने राज्यभरात जोरदार तयारी करत आहे. मनसे आगामी विधानसभा निवडणूक ही स्वबळावर लढवणार आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) हे महाराष्ट्र दौरा करत आहेत. तर मराठवाड्याच्या दौऱ्यानंतर राज ठाकरे हे विदर्भ दौरा करत आहेत. दरम्यान, आज राज ठाकरे हे यवतमाळच्या वणी येथे सभा घेत पक्षातील कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. विधानसभा निवडणुकांची पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी नुकतेच विदर्भ दौऱ्यात आणखी दोन उमदेवारांच्या नावाची घोषणा केली.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मराठावाडा दौरा केल्यानंतर राज ठाकरेंचा विदर्भ दौरा सुरू असून काल ते गडचिरोली जिल्ह्यात होते. भंडारा, गोंदिया जिल्ह्यातून राज ठाकरेंनी गडचिरोली जिल्ह्यातील साकोली येथील मनसैनिक व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर, चंद्रपूर येथील बैठकीत राज ठाकरेंनी मनसेच्या आणखी दोन उमेदवारांची घोषणा केली. त्यामुळे, विधानसभेसाठी मनसेकडून आत्तापर्यंत एकूण 6 उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून राज ठाकरेंनी उमेदवारांच्या बाबतीच षटकार ठोकला आहे. दरम्यान, आजच्या सभेत देखील राज ठाकरे वणी विधानसभेसाठी उमेदवाराची घोषणा करतील का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
विधानसभेसाठी मनसेचे 6 उमेदवार जाहीर
चंद्रपूर येथील मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे यांनी चंद्रपूर आणि राजुरा विधानसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यामध्ये, चंद्रपूर विधानसभेसाठी मनदीप रोडे आणि राजुरा विधानसभा मतदारसंघातून सचिन भोयर यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, यापूर्वी मराठावाडा दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी 4 उमेदवारांची घोषणा केली होती. त्यानंतर, विदर्भ दौऱ्यात 2 उमेदवारांची घोषणा झाल्याने मनसेनं विधानसभेचा षटकार ठोकल्याचं दिसून येत आहे. राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकांत आघाडी घेत मनसेचे 6 उमेदवारी जाहीर केल्यामुळे त्यांनी एकला चलो रेची भूमिका घेतल्याचेही स्पष्ट होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या