आरेचं जंगल मुंबईकरांमुळं वाचलं, शिवसेनेमुळं नव्हे : मनसे नेते अमित ठाकरे
सरकार आणि मुंबई महापालिकेकडे कामकरण्याची इच्छाशक्ती नसल्याचा नसल्याचा आरोप मनसे (MNS) नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी केला आहे.
मुंबई : आरे जंगल वाचवण्याचा श्रेय शिवसेना घेते पण खरा श्रेय हे जनतेची आहे. आरेचं जंगल शिवसेनेमुळे नाही तर जनतेमुळे वाचलं असे मत मनसे नेते अमित ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. एबीपी माझाशी ते बोलत होते. महाराष्ट्राच्या 720 किलोमीटर लांबीच्या समुद्र किनारपट्टीवरील 40 हून अधिक समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी मनसेने पुढाकार घेतला आहे. अमित राज ठाकरे यांच्या नेतृत्वात 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम' राबविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र सरकार, मुंबई महानगरपालिकाकडे पर्यावरणासाठी काम करण्याची इच्छा शक्ती नसल्याच टीका करत अमित ठाकरे म्हणाले, 'समुद्र स्वच्छ ठेवण्यासाठी इतक्या मोठ्या किनारपट्टीवर आपण बरच काही करु शकलो असतो पण ते होत नाही. कारण ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांच्याकडे ती इच्छा शक्ती नाही. देवाने निसर्गाने हे आपल्याला दिलं आहे. आपण नशीबवान आहोत पण ते ही आपण साफ स्वच्छ ठेऊ शकत नाही हे आपल्या दुर्दैव आहे. पर्यटनासाठी आपण किती काही करु शकलो असतो पण कसे होणार? समुद्र किनारे बघाल तर त्यातूनच स्पष्ट होतं की, आपण कुठे आहोत. परदेशात समुद्र किनारे नाहीत का? ते कसे स्वच्छ असतात. जर ते करु शकतात तर अपण का नाही. म्हणूनच मी म्हणतो की सरकार कडून अपेक्षा ठेऊन चालणार नाही. आता आपल्याला स्वःता हे काम हाती घ्यावं लागेल.'
सरकारकडे इच्छा शक्ती नाही असं तुम्हाला का वाटतं? या प्रश्नावर अमित ठाकरे म्हणाले, "पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या शहरांवर, राज्यावर तुमचे प्रेम असले पाहिजे. जर प्रेम नसेल तर ती इच्छा शक्ती निर्माण होणार नाही. मी लहानपणपासून हे पाहतोय आणि आता आपला समुद्र किनारा मरतोय अशी परिस्थिती आहे. सरकार आणि महानगरपालिका यांच्या काम करण्याच्या पद्धतीवरून हे दिसतयं की त्यांचं निसर्गावर प्रेम नाही."
अमित ठाकरे म्हणाले, आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असतील पण मुंबई महानगरपालिका यांच्याकडे मागील 25 वर्षांपासून आहे. जर त्यांनी आपलं काम नीट केलं असत, यंत्रणा नीट बसवली असती तर आज आम्हाला हे काम करावं लागलं असता का? तुम्ही मला सांगा 25 वर्षात आपण काय काय करु शकलो असतो. माझ्यावर होणाऱ्या टीकेंकडे मी लक्ष देत नाही. माझे प्रयत्न प्रामाणिक आहे.
पक्षाच्या या मोहीम बद्दल बोलताना अमित ठाकरे म्हणाले, मी लहानपणापासून दादर, माहिम, गिरगांव चौपाटीवर जातोय, तेव्हा जे समुद्र किनारे सुंदर आणि स्वच्छ असायचे ते आता दिसत नाही. मी किनाऱ्यावर वॉकला जातो तेव्हा असे भकास आणि घाण झालेले समुद्र किनारे पाहून मी माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा केली. मग आम्ही एक दिवस काही सेलिब्रिटीला घेऊन समुद्र किनारे साफ केले. पण अस लक्षात आलं की, एक दिवस हे काम करुन चालणार नाही म्हणून आम्ही उद्या संपूर्ण महाराष्ट्र भर 40 समुद्र किनाऱ्यांवर साफ सफाई करत आहोत’.
MNS : अमित ठाकरेंची शिवसेनेवर टीका : ABP MAJHA
संबंधित बातम्या :
- CDS बिपिन रावत यांच्या निधनानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया
- कोई सरहद ना इने रोके...मुंबईच्या तरुणीला भेटण्यासाठी ओलांडली बॉर्डर, पाकिस्तानी तरुणाला अटक
- Trending : अटारी सीमेवर जन्मलेल्या बाळाचं नाव 'बॉर्डर', नेमकं काय घडलं?
- Pakistan Mob lynching Case : पाकिस्तानातील श्रीलंकन नागरिक हत्याकांड प्रकरण, 800 जणांवर गुन्हा दाखल