Trending : अटारी सीमेवर जन्मलेल्या बाळाचं नाव 'बॉर्डर', नेमकं काय घडलं?
Trending News : एका पाकिस्तानी जोडप्याने आपल्या नवजात बाळाचे नाव 'बॉर्डर' ठेवले आहे. याला कारण म्हणजे ज्या परिस्थितीत या बाळाचा जन्म झाला.
Viral News : एका पाकिस्तानी जोडप्याने आपल्या नवजात बाळाचे नाव 'बॉर्डर' ठेवले आहे. याला कारण म्हणजे ज्या परिस्थितीत या बाळाचा जन्म झाला. हे जोडपे भारत-पाकिस्तानच्या अटारी सीमेवर इतर 97 पाकिस्तानी नागरिकांसह गेल्या 71 दिवसांपासून अडकले आहे. यादरम्यान महिलेने एका मुलाला जन्म दिला आणि अटारी सीमेवर बराच काळ अडकून पडलेल्या अशा परिस्थितीत बाळाचा जन्म झाल्यामुळे महिला आणि तिच्या पतीने आपल्या मुलाचे नाव 'बॉर्डर' ठेवले.
या नवजात बालकाचे पालक, निंबूबाई आणि बालम राम हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील राजनपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मुलाचा जन्म भारत-पाकिस्तान सीमेवर झाल्यामुळे त्याचे नाव बॉर्डर ठेवण्यात आल्याचं पालकांनी सांगितलं आहे. निंबूबाई गरोदर होत्या आणि 2 डिसेंबरला त्यांना प्रसूती वेदना होऊ लागल्या. त्यानंतर आजूबाजूच्या गावातील काही महिला प्रसूतीसाठी निंबूबाईला मदत करण्यासाठी पोहोचल्या.
स्थानिक लोकांनी प्रसूतीसाठी इतर मदत करण्याबरोबरच वैद्यकीय सुविधांचीही व्यवस्था केली. बलम राम यांनी सांगितले की, लॉकडाऊनपूर्वी ते 98 अन्य नागरिकांसह तीर्थयात्रेसाठी आणि नातेवाईकांना भेटण्यासाठी भारतात आले होते. परंतु आवश्यक कागदपत्रांअभावी ते घरी परतू येऊ शकले नाहीत. या अडकलेल्या लोकांमध्ये 47 बालकांचा समावेश आहे, ज्यापैकी सहा भारतात जन्मले असून त्यांचे वय एक वर्षापेक्षा कमी आहे.
एकाने मुलाचे नाव ठेवले 'भारत'
बलम राम व्यतिरिक्त, त्याच्या तंबूत राहणारा आणखी एक पाकिस्तानी नागरिक, लग्या राम यांनी त्याच्या मुलाचे नाव 'भारत' ठेवले आहे. कारण त्याचा जन्म जोधपूरमध्ये 2020 मध्ये झाला होता. लग्या जोधपूर येथे आपल्या भावाला भेटण्यासाठी आले होते, मात्र अद्याप पाकिस्तानात परतले नाहीत.
येथे अडकलेले लोक पाकिस्तानच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांतील रहिवासी आहेत. हे पाकिस्तानी नागरिक सध्या अटारी सीमेवर तंबूत राहत आहेत. कारण पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना स्वीकारण्यास नकार दिला आहे. अटारी इंटरनॅशनल चेकपोस्टजवळील पार्किंगमध्ये ही कुटुंबे तळ ठोकून आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Parambir Singh : परमबीर सिंहांना सुप्रीम कोर्टाचा तुर्तास दिलासा, चार्जशीट दाखल न करण्याचे पोलिसांना आदेश, पुढील सुनावणी 11 जानेवारीला
- Omicron Variant : देशात 21 ओमायक्रॉन बाधित ! प्रशासन सतर्क, संसदेच्या आरोग्य समितीनं बोलावली बैठक
- Wasim Rizvi : वसीम रिझवींनी इस्लाम सोडून स्वीकारला हिंदू धर्म, काय आहे कारण, कोण आहेत रिझवी?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha