एक्स्प्लोर

शिवसेना केसाळ कुत्र्यासारखी : राज ठाकरे

"देशाचा प्रमुख हा राजा असावा, व्यापारी नसावा"

मुंबई : शिवसेना केसाळ कुत्र्यासारखी आहे. कुठून बघायचं हेच कळत नाही. शिवसेनेला स्वत: ची भूमिका राहिली नाही, अशी जळजळीत टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर केली. तसेच, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. शिवसेनेवर टीकास्त्र शिवसेनेने ‘भारत बंद’वर टीका केली. त्यावरील प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरेंनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, “शिवसेना केसाळ कुत्र्यासारखी आहे. कुठून बघायचं हेच कळत नाही. शिवसेनेला स्वत: ची भूमिका राहिली नाही.” तसेच, राज ठाकरे पुढे म्हणाले, “शिवसेनेला स्वतःची भूमिका राहिली नाही. ह्यांची पैश्याची कामं अडली की हे सत्तेतून बाहेर पडायची धमकी देतात आणि कामं झाली की सत्तेत राहतात.” महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन “महाराष्ट्र सैनिकांनी आज उत्तम आंदोलनं केली. मी माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन करतो. त्यांनी सतत असा जागता पहारा ठेवला पाहिजे.”, असे म्हणत राज ठाकरेंनी ‘भारत बंद’मध्ये सहभागी मनसैनिकांचे अभिनंदन केले. भाजपला इशारा “आज महाराष्ट्र सैनिकांवर ज्या पद्धतीची कलमं टाकली गेली, ती पाहून मला भारतीय जनता पक्षाला सांगावसं वाटतं की, आज तुम्ही सत्तेत आहात, उद्या तुम्ही विरोधात असाल. याचा आम्ही समाचार घेऊच, पण भाजपच्या अंगलट हे येणार नक्की”, असा इशारा राज ठाकरेंनी भाजपला दिला. “लोकांचा आक्रोश दिसून आलाय” “रविशंकर प्रसाद म्हणाले की पेट्रोल डिझेलचे भाव कमी करणं आमच्या हातात नाही. मग 2014 च्या आधी तुम्ही यासाठी का बंद पुकारला होतात? पेट्रोल डिझेलच्या भावाने उच्चांक गाठला आहे, रुपयाने निचांक गाठलाय आणि तरीही त्याची भाजपला लाज नाही वाटत. लोकांचा आक्रोश दिसून आलाय.”, असे राज ठाकरे म्हणाले. ...म्हणून ‘भारत बंद’ला पाठिंबा : राज ठाकरे “भारत बंद कोणत्या पक्षाने पुकारला होता हे महत्वाचं नाही. कारण पेट्रोल आणि डिझेलची भाववाढ हा विषय महत्वाचा आहे आणि या दरवाढीमुळे महागाई सर्वत्र वाढली आहे आणि म्हणून हा विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही बंदमध्ये सामील झालो.”, अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली. तसेच, “नोटबंदी, जीएसटी फसली आणि त्यामुळे अर्थव्यवस्था गाळात गेली आणि ती बाहेर काढायला मोदी पेट्रोल-डिझेलवर वाट्टेल तेवढे कर लावत सुटलेत.” असा आरोप राज ठाकरेंनी मोदी सरकारवर केला. निवडणुका जिंकायच्या त्यातून पैसे कमवायचे आणि पुन्हा निवडणुका जिंकायच्या हाच भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा आहे, असाही गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला. देशाचा प्रमुख हा राजा असावा, व्यापारी नसावा, असा टोलाही राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :
  • माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आज उत्तम आंदोलन केलं - राज ठाकरे
  • आजचा बंद कुणी पुकारला, हे महत्वाचं नाही, पेट्रोल-डिझेल हा विषय महत्वाचा आहे - राज ठाकरे
  • पेट्रोल-डिझेलचे दर सरकारच्या हातात नाही, मग भाजप विरोधात असताना का आंदोलन करत होती? - राज ठाकरे
  • लोकांचा रोष महाराष्ट्रभर दिसून आला - राज ठाकरे
  • ज्या प्रकारचं राजकारण भाजप खेळतंय, हे त्यांच्याही अंगलट येईल - राज ठाकरे
  • परिणाम दिसायला बाहेर यावं लागतं, राज ठाकरे यांचा शिवसेनेला टोला
  • शिवसेनेला स्वत:ची भूमिका नाही - राज ठाकरे
  • शिवसेनेला स्वत:ची भूमिका नाही, त्यामुळे त्यांना भाव देण्यात काही अर्थ नाही - राज ठाकरे
  • पैश्याची कामं अडली की शिवसेना सत्तेतून बाहेर पडायची धमकी देते आणि कामं झाली की सत्तेत राहते - राज ठाकरे
  • शिवसेनेची अवस्था केसाळ कुत्र्यासारखी - राज ठाकरे
  • देशाचा प्रमुख राजा असावा, व्यापारी नसावा - राज ठाकरे
  • नोटाबंदी, जीएसटी फसल्याने लोकांच्या खिशात हात - राज ठाकरे
  • हे (मोदी सरकार) काँग्रेसपेक्षा वाईट आहेत, खास करुन दोन माणसं, म्हणजे मोदी आणि शाह  - राज ठाकरे
  • लोकांच्या सुख-दु:खाशी शिवसेनेला काहीही घेणं-देणं नाही - राज ठाकरे
VIDEO : राज ठाकरे यांची संपूर्ण पत्रकार परिषद

महत्त्वाच्या बातम्या

Drought Action Plan : फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! महाराष्ट्रातील चारा परराज्यात पाठवण्यास बंदी, वीजनिर्मितीसाठी चाऱ्याचा वापर बंद
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! महाराष्ट्रातील चारा परराज्यात पाठवण्यास बंदी, वीजनिर्मितीसाठी चाऱ्याचा वापर बंद
हा ओलावा, भविष्यात काय होईल सांगता येत नाही, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर येताच संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
हा ओलावा, भविष्यात काय होईल सांगता येत नाही, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर येताच संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
एप्रिल मे मध्ये उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार, मंत्री नितेश राणेंचा दावा, म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीसच राहणार, आम्ही राज ठाकरेंना नाराज करणार नाही 
एप्रिल मे मध्ये उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार, मंत्री नितेश राणेंचा दावा, म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीसच राहणार, आम्ही राज ठाकरेंना नाराज करणार नाही 
महायुतीमध्ये सतत वाद! कृषीमंत्री भरणे म्हणाले, हे वाद खाली, वरती मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री भक्कम
महायुतीमध्ये सतत वाद! कृषीमंत्री भरणे म्हणाले, हे वाद खाली, वरती मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री भक्कम

व्हिडीओ

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये विजय मिळवत आमदार होताच हर्षदा देशमुख जाधव साताऱ्यात पोहोचल्या, पुढील वाटचालीबाबत म्हणाल्या..
पुणे पदवीधरची निवडणूक जनतेनं हातात घेतलेली, पवारसाहेबांच्या आशीर्वादनं महाराष्ट्राला पहिली महिला पदवीधर आमदार मिळाली : हर्षदा देशमुख जाधव
SPPU Exam Postponed : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
Devendra Fadnavis: बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
Shreyas Iyer : आम्हाला पुन्हा विचार करावा लागेल...,श्रेयस अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
न्यूझीलंडनं भारताच्या विजयाचा रथ रोखला,अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
Joshimath Helicopter Crash: बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
Raju Shetti: ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
Embed widget