एक्स्प्लोर

नाना पटोलेंच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्याची चौकशी करा; शिवडी दंडाधिकारी कोर्टाचे निर्देश

पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या वक्तव्यावरुन भाजप युवा मोर्चाने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. 

मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विवादीत वक्तव्याप्रकरणी तपास करण्याचे आदेश शिवडी दंडाधिकारी कोर्टानं भोईवाडा पोलीस ठाण्याला दिले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप नाना पटोले यांच्यावर करत भाजप युवा मोर्चानं त्यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी शिवडी दंडाधिकारी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 

जानेवारी महिन्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेदरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. "मी मोदींना मारू शकतो, त्यांना शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आले’’ असं नाना पटोले म्हणाले होते. पंतप्रधान हे देशातील एक घटनात्मक पद आहे. या पदाचा अपमान म्हणजे हा संपूर्ण देशाचा आणि भारतातील प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या  वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आपला निषेध व्यक्त केला होता. 

याचसंदर्भात भाजप युवा मोर्चानं 18 जानेवारी रोजी मरीन ड्राइव्ह तसेच बांगुर नगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रारही दिली होती. मात्र, अद्याप नाना पटोलेंवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर पोलीस उपायुक्त आणि भोईवाडा पोलीस ठाण्यातही तक्रार करण्यात आली. मात्र त्याचीही कोणतीच दखल न घेतल्याने अखेर भाजप युवा मोर्चाने शिवडी दंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली याचिका दाखल केली. या प्रकरणी दंडाधिकारी पी. आय. मोकाशी यांच्यासमोर सुनावणी पार पडली असता त्याची दखल घेत न्यायालयाने याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश भोईवाडा पोलिसांना दिले आहेत. तसेच त्याबाबत अहवाल 26 मेपर्यंत सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी तहकूब केली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाच्या बैठका सुरु, निवडणुकीनंतर हे एकत्र येतील, प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्पोट

मुंडेच वरचढ, जिल्ह्यातील राजकीय घराणेशाहीचा बीड पॅटर्न; 2024 च्या निवडणुकीतही नातीगोतीच

मोठी बातमी : लॉरेन्स बिश्नोईला विधानसभा लढण्याची ऑफर, थेट  झिशान सिद्दिकींविरोधात मैदानात उतरवण्याची तयारी!

मोठी बातमी : पंकजा मुंडेंची साथ सोडली, भाजप जिल्हाध्यक्षाचा राजीनामा, राजेंद्र मस्के शरद पवारांच्या राष्ट्रवादीत!
मोठी बातमी : पंकजा मुंडेंची साथ सोडली, भाजप जिल्हाध्यक्षाचा राजीनामा, राजेंद्र मस्के शरद पवारांच्या राष्ट्रवादीत!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 03 PM : 22 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सPune Money Seized : कारमध्ये सापडलेल्या 5 कोटींवरून आरोप प्रत्यारोपTop 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 22 ऑक्टोबर  2024 : ABP MajhaDhananjay Mahadik : चिरंजीव कृष्णराज महाडिकांच्या उमेदवारीसाठी धनंजय महाडिक सागरवर साखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाच्या बैठका सुरु, निवडणुकीनंतर हे एकत्र येतील, प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्पोट
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाच्या बैठका सुरु, निवडणुकीनंतर हे एकत्र येतील, प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्पोट
मुंडेच वरचढ, जिल्ह्यातील राजकीय घराणेशाहीचा बीड पॅटर्न; 2024 च्या निवडणुकीतही नातीगोतीच
मुंडेच वरचढ, जिल्ह्यातील राजकीय घराणेशाहीचा बीड पॅटर्न; 2024 च्या निवडणुकीतही नातीगोतीच
मोठी बातमी : लॉरेन्स बिश्नोईला विधानसभा लढण्याची ऑफर, थेट  झिशान सिद्दिकींविरोधात मैदानात उतरवण्याची तयारी!
मोठी बातमी : लॉरेन्स बिश्नोईला विधानसभा लढण्याची ऑफर, थेट झिशान सिद्दिकींविरोधात मैदानात उतरवण्याची तयारी!
मोठी बातमी : पंकजा मुंडेंची साथ सोडली, भाजप जिल्हाध्यक्षाचा राजीनामा, राजेंद्र मस्के शरद पवारांच्या राष्ट्रवादीत!
मोठी बातमी : पंकजा मुंडेंची साथ सोडली, भाजप जिल्हाध्यक्षाचा राजीनामा, राजेंद्र मस्के शरद पवारांच्या राष्ट्रवादीत!
महाविकास आघाडीची आज महत्वाची  बैठक, जागावाटपाचं सुत्र ठरलं, कोणता पक्ष किती जागा लढवणार?

शिवसेनेचं मशाल चिन्ह दाखवत उद्धव ठाकरेंचं महत्वाचं आवाहन; निवडणूक आयोगाबद्दल सांगितलं

Belapur Vidhan Sabha: संदीप नाईकांनी अख्ख्या पायदळासोबत शरद पवार गटात प्रवेश केला, बेलापूरमध्ये मंदा म्हात्रेंसमोर तगडं आव्हान?
संदीप नाईकांनी अख्ख्या पायदळासोबत शरद पवार गटात प्रवेश केला, बेलापूरमध्ये मंदा म्हात्रेंसमोर तगडं आव्हान?
अजित पवारांच्या खांद्यावर गदा; हिंद केसरी अन् महाराष्ट्र केसरी दीनानाथ सिंहांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Embed widget