एक्स्प्लोर
जाहीर सभेत बच्चू कडू यांची पोलिसांना शिवीगाळ

अमरावती: प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे. कारण बच्चू कडू यांनी जाहीर सभेत पोलीस अधीक्षकांनी शिवीगाळ केली आहे. अमरावती जिल्ह्यात अवैध धंदे आणि दारु तस्करी प्रकरणी प्रहारच्या कार्यकर्त्यांवर तडीपारीचे गुन्हे दाखल करण्य़ात आले आहेत. त्यामुळे पोलीस अधीक्षक लक्ष्मी गौतम यांच्याविरोधात अन्नत्याग आंदोलन सुरु केलं. यावेळी भाषण करताना बच्चू कडू यांनी लक्ष्मी गौतम यांच्याबद्दल अश्लील भाषेत शिवीगाळ केली आहे. इतकंच नाही तर पोलीस कर्मचाऱ्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. मात्र, बच्चू कडू यांनी लावलेले सर्व आरोप पोलीस अधीक्षक लक्ष्मी गौतम यांनी फेटाळून लावले आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
पुणे
क्रिकेट























