एक्स्प्लोर
'हेमा मालिनी चित्रपटात दारु पितात, म्हणून...' बच्चू कडूंची सारवासारव
उस्मानाबाद : 'ड्रीमगर्ल' हेमामालिनी यांच्यावरील टीकेनंतर वादाचा धुरळा उडाल्यामुळे अखेर आमदार बच्चू कडू यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. हेमा मालिनी चित्रपटात दारु पितात, त्यामुळे आपण असं वक्तव्य केल्याचा दावा कडू यांनी केला.
'मी हेमामालिनी यांचे चित्रपट जास्त पाहतो. त्या चित्रपटांमध्ये त्या जास्त दारु पिताना दिसतात. म्हणूनच मी हेमा मालिनी दारु पितात' असं म्हटल्याची सारवासारव बच्चू कडू यांनी केली. नांदेडमध्ये केलेल्या वक्तव्यानंतर उस्मानाबादेत बच्चू कडूंनी घुमजाव केलं.
दारुमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात हा दावा खोडून काढताना बच्चू कडू यांनी हेमामालिनी यांचं उदाहरण दिलं आहे. मात्र त्यांच्या या विधानाने नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाल्याने त्यांनी आपली बाजू स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला.
हेमामालिनी रोज बंपर दारु पितात, त्यांनी आत्महत्या केली का? : बच्चू कडू
“नारायण राणे म्हणाले होते की दारु पिऊन आत्महत्या होते. गडकरीसाहेब म्हणत होते की लग्नाचा खर्च जास्त झाल्यावर शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात. वेगवेगळ्या लोकांनी अशी विधानं केलेली पाहतो. त्यांना माझा असा सवाल आहे की, दारु कोण पित नाही? 75 टक्के आमदार दारु पितात. खासदार पितात, पत्रकारही पितात. मग ती हेमामालिनी तर रोज एक बंपर दारु पिते, मग तिने अजून आत्महत्या केली नाही,” असं बच्चू कडू म्हणाले. पाहा व्हिडीओअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement