एक्स्प्लोर
Advertisement
मिरज-लातूर पाणी एक्स्प्रेसला तांत्रिक खोडा
सांगली: मिरज - लातूर पाणी एक्प्रेसला तांत्रिक अडचणींमुळे आणखी आठ दिवस खोडा लागणार आहे. त्यामुळे मिरजहून लातूरला निघणारी पाणी एक्स्प्रेस आता लांबणार आहे. पाणी उपसण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींमध्ये काही तांत्रिक अडचणी उभ्या राहिल्या आहेत.
वारणा धरणातून पाणी उपसण्यासाठी आवश्यक त्या क्षमतेचा पंपही उपलब्ध नाही. शिवाय पंपापासून यार्डपर्यंत जी पाईपलाईन गरजेची आहे., तिला अद्याप तांत्रिक मान्यताही मिळालेली नाही. साधारण साडे चार किलोमीटर अंतर असणाऱ्या या पाईपलाईनसाठी १ कोटी ८० लाखांचा खर्ज येणार आहे
दोन दिवस प्रशासकीय मान्यता न मिळाल्याने पंप हाऊस ते यार्ड काम रखडलं. हे काम पूर्ण होण्यासाठी आठ दिवस लागणार आहेत. म्हणजे तोपर्यंत कोट्याहून निघालेली गाडी यार्डातच थांबून राहणार.
मिरजेत ज्या ठिकाणाहून पाणी नेण्यात येणार आहे, त्या ठिकाणी साडे चार किलो मिटरची पाईप लाईन सोडून रेल्वेच्या पंप हाऊसवर एक मोठा पंप बसवायचा आहे. ते काम अपूर्ण आहे. या साडेचारकोटीच्या पाईपलाईनला तांत्रिक मान्यता मिळाली नाही. ही मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष काम चालू होऊन, पाणी भरून, रेल्वे सुटण्यासाठी अजून आठ दिवस लागतील.
मिरज टू लातूर… पाणी एक्स्प्रेस
लातुरातील पाण्याची भीषण परिस्थिती पाहता, राज्य सरकारने लातुरला रेल्वेने पाणी नेण्याचा निर्णय घेतला आहे. लातूरला रेल्वेनं येणारं पाणी हे उजनीऐवजी मिरजेतून देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. उजनीऐवजी लातूरकरांसाठी मिरजेहून पाणी आणण्याचा निर्णय घेतला. येत्या 15 दिवसांत दोन ट्रेनच्या माध्यमातून 5 एमएलडी पाणी लातूरकरांसाठी आणणार असल्याचं महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितलं.
उजनीतून पाणी आणण्यास यंत्रणा नाही!
आधी लातूरमध्ये उजनीतून रेल्वेच्या माध्यमातून पाणी आणण्याचा निर्णय झाला होता. मात्र, उजनी धरणापासून पंढरपूर रेल्वे स्थनाकापर्यंत पाणी आणण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी राहिली नाही. त्यामुळे अखेर मिरजेतून पाणी आणण्याचा निर्णय घेण्यात आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement