एक्स्प्लोर

सहगल यांना न बोलावल्याने महाराष्ट्राचे नाक कापले : विनोद तावडे

नयनतारा सहगल वादात मुख्यमंत्र्यांचे नाव गोवले जाणे गैर आहे. सहगल यांना दिलेले निमंत्रण मागे घेण्याचा साहित्य महामंडळाचा निर्णय सरकारलाही पटला नाही. या निर्णयामुळे महाराष्ट्राचं नाक कापले गेले अशी तिखट प्रतिक्रिया तावडे यांनी दिली आहे.

मुंबई :  ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना न बोलावले गेल्याने महाराष्ट्राचे नाक कापले गेल्याचे मत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले. यवतमाळच्या साहित्य संमेलनात ते बोलत होते. संमेलनाला कुणाला बोलवायचे आणि कुणाला नाही हे सांगणे सरकारचे काम नसते. नयनतारा सहगल वादाशी सरकारचे काहीही घेणेदेणे नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. सहगल यांचे मुखवटे घालून निषेध दरम्यान, उद्घाटन सोहळ्यावेळी संमेलन परिसरात निषेधाचे सूर उमटताना पाहायला मिळाले. स्वागताध्यक्ष मदन येरावार यांचं भाषण सुरु असतानाच विचारमंचासमोर काही महिलांनी नयनतारा सहगल यांचे मुखवटे घालून आपला निषेध व्यक्त केला. सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्याचा निषेध या महिलांनी व्यक्त केला. त्यानंतर तातडीने या महिलांकडून मुखवटे काढून घेण्यात आले आणि त्यांना बाहेर काढण्यात आले. याचबरोबर यवतमाळमधील विजय ठाकरे या नागरिकाकडून नयनतारा यांच्या मराठी भाषणाच्या प्रतिंचंही वाटप केलं. त्यामुळे हे संमेलन वादग्रस्तच ठरत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेंच्या भाषणादरम्यान काही निदर्शकांनी गोंधळ घालत घोषणाबाजी केली. साहित्य महामंडळाचा निर्णय सरकारलाही पटला नाही नयनतारा सहगल वादात मुख्यमंत्र्यांचे नाव गोवले जाणे गैर आहे. सहगल यांना दिलेले निमंत्रण मागे घेण्याचा साहित्य महामंडळाचा निर्णय सरकारलाही पटला नाही. या निर्णयामुळे महाराष्ट्राचं नाक कापले गेले अशी तिखट प्रतिक्रिया तावडे यांनी दिली आहे. एवढंच नाही तर मराठी भाषेच्या संवर्धनसाठी हे सरकार विशेष प्रयत्न करत असल्याचेही विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. सगळ्या शाळांना चौथीच्या वर्गापर्यंत मराठीची सक्ती करण्यात आली आहे. हा नियम ज्या शाळा डावलतील त्यांच्यावर कारवाई होईल असाही इशारा तावडे यांनी दिला.

माझ्या वैधव्याला व्यवस्था जबाबदार : वैशाली येडे यांची टीका

सध्या शेतकरी आणि लेखकाला भाव नाही. माझ्या वैधव्याला व्यवस्था जबाबदार आहे, अशा शब्दात सरकारवर घणाघात करत साहित्य संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे यांनी 92 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले. अडचणीच्यावेळी दिल्लीतच तर गल्लीतही बाईच कामी येते हे पुन्हा पुन्हा सिद्ध झाले आहे. आज दिल्लीची नाही तर गल्लीची बाई कामात आली आहे. आम्ही विधवा नाही एक महिला आहोत. नवरा कमकुवत होता तो गेला मी लढणार आहे. सध्या शेतकरी आणि लेखकाला भाव नाही, असेही उद्घाटक वैशाली येडे म्हणाल्या. साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात रिमोटद्वारे बटण दाबून दीपप्रज्ज्वलन करण्यात आले.  लेखिका नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून बोलवण्यात आले होते. मात्र त्यांना दिलेले निमंत्रण मागे घेतल्यानंतर शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवेच्या हस्ते या साहित्यसंमेलनाचे उद्घाटन करण्याचा निर्णय झाला होता. नयनतारा सहगल यांच आमंत्रण रद्द केल्यानंतर उद्घाटक म्हणून काही नावं सुचवण्यात आली होती. मात्र त्यापूर्वीच साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. संमेलनाचं उद्घाटन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते करण्यात यावा, अशी मागणी आयोजकांकडून करण्यात आली होती. ही मागणी मान्य करत महामंडळाने यवतमाळमधील कळंब तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी वैशाली सुधाकर येडे यांना साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून मान दिला होता.

सहगल यांचे निमंत्रण रद्द करणे अत्यंत निषेधार्ह : संमेलनाध्यक्षा अरूणा ढेरे

कोण आहेत वैशाली येडे? वैशाली येडे यांच्या पतीने सात वर्षापूर्वी आत्महत्या केली होती. त्यांना दोन मुले आहेत. तीन एकर शेती आहे. त्या सध्या अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करत आहेत. एक वर्षापासून नाटक क्षेत्राशी त्या जोडल्या गेल्या आहेत. त्यांच्या जीवनावर प्रसिद्ध दिग्दर्शक हरीश इथापे यांनी 'तेरवं' नाटक लिहिले आहे. त्यात यांच्या जीवनाचा संघर्ष होता. त्या नाटकांत त्यांनी भूमिका देखील केली आहे.

आपण झुंडशाहीला बळी पडलो, माजी संमेलनाध्यक्षांचा घणाघात

साहित्य संमेलनाच्या उद्घाटक पदासाठी या तीन नावांची शिफारस झाली होती नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द केल्यानंतर 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. आयोजन समितीने संमेलनाचे उद्घाटक म्हणून आता तीन नवीन नावं सुचवली होती. प्रसिद्ध साहित्यिक महेश एलकुंचवार, सुरेश द्वादशीवार आणि विठ्ठल वाघ या तिघांची नावं यवतमाळ आयोजन समितीनं सुचवली होती. मराठी साहित्य महामंडळाने संमेलनाच्या आयोजन समितीला पत्र पाठवून नवीन उद्घाटक म्हणून आपणास काय सुचवायचं आहे, अशी विचारणा केली होती. त्यावर आयोजन समितीने संमेलनाचे उद्घाटक म्हणून तीन नावं सुचवली. यवतमाळ मराठी साहित्य संमेलन बाबत निमंत्रण संस्थांमधील अनेकांनी न येण्याचा निर्णय घेण्याची चळवळ सुरू झाली. त्या परिस्थितीतमध्ये निमंत्रक संस्थाची भूमिका काय आहे ते तातडीने कळवावे तसेच उद्घाटक म्हणून आपणास काय सुचवायचे ते सुद्धा तातडीने सुचवावे, असं पत्र साहित्य महामंडळाने यवतमाळ आयोजन समितीला पत्र पाठवलं होतं. संबंधित बातम्या

सहगल यांचे निमंत्रण रद्द करणे अत्यंत निषेधार्ह : संमेलनाध्यक्षा अरूणा ढेरे

आपण झुंडशाहीला बळी पडलो, माजी संमेलनाध्यक्षांचा घणाघात
साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा राजीनामा साहित्य संमेलनाच्या उद्घाटक पदासाठी या तीन नावांची शिफारस मराठी साहित्य संमलेन अध्यक्षा अरुणा ढेरेंना डॉ. मुणगेकरांचं खुलं पत्र 92 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अरुणा ढेरेंची निवड
नयनतारा सहगल यांच्या अपमानावर विविध मान्यवरांचा संमेलनावर बहिष्कार
मराठी साहित्य संमेलनात वाचलं न जाणारं नयनतारा सहगल यांचं 'ते' भाषण
... तर मनसे उधळणार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!
नयनतारा सहगल यांना विरोध नाही : राज ठाकरे
नयनतारा सहगल यांच्या अपमानाचे साहित्य विश्वात पडसाद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget