Uday Samant : भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय 'त्याच' जागेवर होणार , उदय सामंतांची माहिती
काही तांत्रिक अडचणींमुळे ही जागा महाविद्यालयासाठी मिळू शकली नाही.
Uday Samant : आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन (Bharat Ratna Lata Dinanath Mangeshkar International Music College) करण्याचे लता मंगेशकर यांचे स्वप्न होते. आता ते स्वप्न सत्यात उतरणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली आहे. तसेच ऑफलाईन परीक्षांसंदर्भातही सामंत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. काय म्हणाले उदय सामंत?
भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय 'त्याच' जागेवर होणार
भारतरत्न स्वर्गीय लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयासाठी विद्यापीठाकडे जागा मागितली होती. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ही जागा मिळू शकली नाही. कलिना संकुलाच्या अगदी समोर उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे तीन एकरची जागा आधी इंडियाबुल्स कडे होती. ती जागा आता पुन्हा विभागाच्या ताब्यात आहे. त्या जागेवर भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय निर्माण करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे असे सामंत म्हणाले. आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्याचे लता मंगेशकर यांचे स्वप्न होते. कलिना कॅम्पससमोर असे विद्यालय स्थापन करण्यासाठी एका समितीची स्थापनाही करण्यात आली होती. आता याच समितीने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे नाव भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर असे असावे असा प्रस्ताव दिला. लतादीदींच्या निधनानंतर आता हे आंतरराष्ट्रीय महाविद्यालय स्थापन करण्यात येत असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माहिती देताना म्हणाले.
कुठल्याही स्थितीत ऑफलाइन परीक्षा सुरूच कराव्या लागणार
सामंत म्हणाले, कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागल्याने आता आपल्याला ऑफलाइन परीक्षाकडे वळावं लागणार आहे, त्यामध्ये कुठलाही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची सुद्धा काळजी घेतली जाईल. अजूनही काही भागात एसटी बंद आहेत. यामुळे जर परीक्षा विद्यार्थ्यांना देता येत नसतील तर त्यासाठी सुद्धा पर्यायी व्यवस्था आम्ही करणार आहोत, मात्र आता कुठल्याही स्थितीत ऑफलाइन परीक्षा सुरूच कराव्या लागणार आहे.
ग्रंथालयातील पुस्तकांबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतली दखल
एबीपी माझाने मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयातील पुस्तकांची दुरावस्था दाखवल्यानंतर त्याची दखल उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतली. त्याबाबत प्रतिक्रिया देताना सामंत म्हणाले, आज विद्यापीठ अधिकारीसोबत आढावा बैठक घेतली. विद्यापीठाच्या ग्रंथालयाची बातमी माध्यमांनी समोर आणली. त्यानंतर मी स्वतः त्या ग्रंथालयाला जाऊन भेट दिली. ग्रंथालयच्या नवीन इमारत तयार असताना बीएमसीकडून एनओसी मिळाली नव्हती. आता त्या संदर्भात आम्ही बैठक घेऊन सूचना केल्या आहेत, सर्व प्रक्रिया लवकर पूर्ण होणार. येत्या 15 दिवसात जुन्या ग्रंथालयातील सर्व पुस्तके नव्या ग्रंथालय इमारतीत स्थलांतरित होतील अशी माहिती सामंत यांनी दिली.
इतर महत्वाच्या बातम्या
Maharashtra Assembly Budget Session : 3 ते 25 मार्च दरम्यान यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha