... त्यावेळेस मी घरच्या गादीवर बसेन; बीडमधून पंकजा मुंडेंचा घणाघात, भगवान गड ते कुंभमेळा, सगळंच काढलं
जोपर्यंत लोकांना मी हवी आहे, तोपर्यंत मी काम करत राहील. ज्यावेळेस लोक म्हणतील की आता आम्हाला तुमची गरज नाही त्यावेळेस मी घरच्या गादीवर बसेल असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केलं

Pankaja Munde : जोपर्यंत लोकांना मी हवी आहे, तोपर्यंत मी काम करत राहील. ज्यावेळेस लोक म्हणतील की आता आम्हाला तुमची गरज नाही त्यावेळेस मी घरच्या गादीवर बसेल असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे ( Minister Pankaja Munde) यांनी केलं आहे. या लोकांनी ऊस तोडू नये असं मला हृदयातून वाटतं. मात्र, यांची पुढची पिढी आता ऊस तोडणार नाही असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं. ऊसतोड कामगारांसाठी ही पंकजाताई नेहमी उभी राहील असेही त्या म्हणाल्या.
भगवान बाबांच्या दर्शनासाठी मला कुठेही जावे लागत नाही
पब्लिक आपली करायची म्हणून मला गडावर जाऊ वाटत नाही असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. राजकारणामध्ये आणि धर्म कारणांमध्ये एकमेकांबरोबर त्यांचं नातं असलं पाहिजे पण तेवढीच वृत्ती पण असली पाहिजे असेही त्या म्हणाल्या. धर्मसत्ता आणि राजसत्ता हातात हात घालून चालत असते. बीड जिल्ह्यातले 25 ते 50 हजार कुंभमेळ्यात जाऊन डुबकी मारून आलेत. म्हणजे पुढचे पाप करायला मोकळे झालेत का? असा सवाल मुंडे यांनी केला. भगवान बाबांच्या दर्शनासाठी मला कुठेही जावे लागत नाही. मी डोळे जरी झाकले तरी मला साक्षात भगवान बाबाचे दर्शन होतं. मी स्वतः भगवान बाबा पाहिले नाहीत मात्र अनेक काहण्या ऐकल्या आहेत असंही मुंडे म्हणाल्या.
मी कशामुळे नवीन पक्ष स्थापन करेल
कोयत्यांना धार देण्यासाठी मी कायम उभी राहील असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. हा वाक्यप्रचार रुढ आहे. तुम्ही लगेच काहीही लावता असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
मी कोणत्या गुंडाला घाबरत नाही. मी गुंडाला गुंड आणि बंडाला बंड आहे. मी कशामुळे नवीन पक्ष स्थापन करेल. दिल्लीमध्ये नरेंद्रजी मोदी यांची सत्ता आहे. राज्यात देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत. मी स्वतः मंत्री आहे असं असताना मी नवीन पक्ष का काढेल? असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
मंत्री झाले काय, नाही झाले काय, काही फरक पडत नाही
मला मंत्री झाले काय नाही झाले काय, काही फरक पडत नाही. एवढे प्रेम तुम्ही करता असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. पण मंत्रीपदामुळं अधिकार येतात असंही त्या म्हणाल्या. 1825 दिवस आहेत माझ्याकडे सत्तेचे. वरचे 225 दिवस असेच जातात. माझ्या 1600 दिवसात राज्यातील प्रत्येक भागात माझ्या विभागाकडून न्याय देण्याचं काम करेल असेही मुंडे म्हणाल्या.























