Gulabrao Patil : केळी संशोधन केंद्रासाठी 100 कोटींची तरतूद, मंत्रीमंडळ बैठकीत प्रस्ताव मंजूर होणार : गुलाबराव पाटील
Gulabrao Patil: केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी जे करता ते करणार असल्याचे मत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी केलं.
Majha Katta Gulabrao Patil: केळीच्या दराबाबत (banana)अद्याप धोरण ठरलेलं नाही हे सत्य आहे. पण केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी जे करता ते करणार असल्याचे मत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी केलं. केळी पिकासाठी संशोधन केंद्र व्हावं, यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करावी अशी मागणी केली आहे. त्याला मंजूरी देण्याचा प्रस्ताव पुढच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत येणार असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले.
रोजगार हमीमध्ये केळीचा समावेश करावा यासाठी पाठपुरावा केला
गुलाबराव पाटील हे एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर (Majha Katta) आले होते. यावेळी त्यांनी विविध मुद्दे मांडले. केळी पिकासह, सोयाबीन आमि कापसाच्या पडणाऱ्या दराबाबत गुलाबराव पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी मी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. केळीला फळाचा दर्जा द्यावा यासाठी विधानसभेत मी सातत्यानं आवाज उठवल्याचे वक्तव्य राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं. तसेच रोजगार हमीमध्ये केळीचा समावेश करावा यासाठी देखील मी सातत्यानं पाठपुरावा केला होता. आज केळीचा रोजगार हमी योजनेत समावेश केला असून याचा शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचे पाटील म्हणाले.
जोपर्यंत प्रकिया उद्योग होणार नाहीत, तोपर्यंत कापसाला चांगला दर मिळणार नाही
कापसाचे दर हे सातत्यानं दर उतरत आहेत. याबाबत देखील गुलाबराव पाटील यांनी विचारण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, कापसाच्या दरात स्थिरता नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाच्या दरात सातत्यानं चढ उतार होत आहे. पहिल्या टप्प्यात कापसाचे दर हे 9200 पर्यंत गेले होते. त्यानंतर दरात घसरण झाल्याचे पाटील म्हणाले. सध्या सात हजारापर्यंत कापसाचे दर आहेत. जोपर्यंत टेक्सटाईल पार्क तयार होत नाहीत. तोपर्यंत कापसाला पाहिजे त्या प्रमाणात दर मिळणार नसल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. कापसासाठी प्रक्रिया उद्योग होणं गरजेचे असल्याचे पाटील यांनी सांगितले.
...तर शिवसेनेत फूट पडली नसती
शिवसेनेतील बंडाबाबत, सध्याच्या राजकारणाबाबत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी 'माझा कट्टा'वर विविध प्रश्नांना उत्तरे दिली. शिवसेनेत घडामोडीमुळे दु:खही वाटते आणि आनंदही वाटत असल्याचे त्यांनी म्हटले. बाळासाहेबांचे विचार, मराठी माणूस, हिंदुत्वाच्या विचारापासून दूर जात होतो. मात्र, आम्ही निर्णय घेतल्याने शिवसेनेला पुन्हा त्याच्या मुख्य मुद्दावर आणले असल्याचा आनंद वाटत असल्याचे गुलाबराव पाटील यांनी म्हटले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी किंवा आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी राज्यभरात फिरून आमदारांची मते जाणून घेतली असती तर शिवसेनेत फूट पडली नसती, असेही पाटील म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: