एक्स्प्लोर
गिरीष महाजनांवर गुन्हा दाखल करा: राष्ट्रवादी काँग्रेस
वन कायद्याचा भंग केल्याने, महाजनांवर गुन्हा दाखल करुन त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली.

जळगाव: जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करुन, त्यांची हकालपट्टी करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. गिरीष महाजन हे चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे आणि लोंढे शिवारात नरभक्षक बिबट्याच्या मागे बंदूक घेऊन धावले होते. त्यामुळे त्यांनी वन कायद्याचा भंग केल्याने, त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. गिरीष महाजनांनी काल केलेल्या हिरोपंतीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. गेल्या दोन महिन्यात नरभक्षक बिबट्यानं सहा जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे या परिसरात दहशतीचं वातावरण आहे. त्यानंतर सरकारनं या बिबट्याला ठार मारण्याचे आदेश दिले आहेत. मात्र ही जबाबदारी वन विभागाची असताना गिरीष महाजनांनी सुरक्षेची तजवीज नसताना नसती उठाठेव का केली? हा सवाल आहे. https://twitter.com/nawabmalikncp/status/935359466786000896 संबंधित बातम्या हातात बंदूक घेऊन गिरीश महाजन नरभक्षक बिबट्याच्या शोधाला
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
करमणूक
महाराष्ट्र
विश्व























