एक्स्प्लोर
MIM च्या प्रदेशाध्यक्षाला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी
तीन दिवसांपूर्वी काँग्रेस आणि एमआयएममध्ये हाणामारीची घटना घडली होती.
नांदेड : एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. हाणामारीच्या गुन्ह्यात सय्यद मोईन यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
तीन दिवसांपूर्वी काँग्रेस आणि एमआयएममध्ये हाणामारीची घटना घडली होती. या प्रकरणात एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांच्यासह त्यांच्या साथीदारांविरोधात हत्येचा प्रयत्न करणे या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.
या घटनेनंतर पोलिसांनी सय्यद मोईन यांना अटक करुन दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवले होते. त्यानंतर सय्यद मोईन यांना आज नांदेड जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सय्यद मोईन यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement