एक्स्प्लोर

राज्यात दुधाचा दर निश्चित! ठरवून दिलेला दर न दिल्यास, अन् भेसळ आढळल्यास थेट गुन्हा; मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती 

Milk Price News : राज्यातील दूध उत्पादन शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील दुध संकलन केंद्रांमध्ये दुधाचा दर निश्चित करण्यात आला आहे.

अहमदनगर : राज्यातील दूध उत्पादन शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील दुध संकलन केंद्रांमध्ये दुधाचा दर (Milk Price) निश्चित करण्यात आला आहे. राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 30 रुपये दर आणि 5 रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यानुसार दुध संकलन केंद्रांना शेतकऱ्यांच्या दुधाला प्रती लीटर ठरवून दिलेला देणे बंधनकारक करण्यात आल्याची माहिती, राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखें पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली आहे.

तसेच दुधाला ठरवून दिलेला दर न देणाऱ्या दूध संकलन केंद्रावर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे. सोबतच दूध भेसळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात समिती स्थापन करण्यात आली असून, ज्या ठिकाणी दूध भेसळ आढळेल तेथे थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देखील देण्यात आल्याची माहिती राधाकृष्ण विखे यांनी दिली आहे. ते अहमदनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

दुधात भेसळ आढळल्यास थेट गुन्हा

राज्य सरकारने दुधाच्या दरासंदर्भात (Milk Price) येत्या चार दिवसांमध्ये ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा महामार्ग रोखत शेतकरी 'शेतकऱ्यांचे मेगाब्लॉक' आंदोलन सुरु करतील, असा इशारा किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले (Ajit Nawale) यांनी दिला होता. तर दुधाला प्रति लिटर 40 रुपये हमीभाव मिळावा, या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने कोतुळ येथे धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे. या धरणे आंदोलनाचा आजचा 26वा दिवस आहे. दरम्यान, दूध हमीभावाबद्दल ठोस आश्वासन नसल्याने आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय या आंदोलकांनी घेतला आहे.

असे असताना  राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखें पाटील यांनी आज हा निर्णय घेत दुध संकलन केंद्रांना शेतकऱ्यांच्या दुधाला प्रती लीटर 30 रुपये दर देणे बंधनकारक करण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता राज्यातील दूध उत्पादन शेतकरी या निर्णयाचे स्वागत करतात की, आपल्या 40 रुपयांच्या दारावर कायम राहतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

दुध, दुग्धजन्य पदार्थात भेसळ करणाऱ्या विरोधात एमपीडीए-मंत्री धर्मराव बाबा आत्राम

राज्य सरकार दुधात भेसळ करणाऱ्या विरोधात कारवाईसाठी भक्कम कायदा तयार करण्याच्या तयारीत आहे. दुध आणि दुग्धजन्य पदार्थात भेसळ करणाऱ्या विरोधात एमपीडीए लावला जाईल, अशी माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी 'एबीपी माझा' शी बोलताना दिली आहे. एवढेच नाही तर दूध आणि दुग्धजन्य पदार्थात भेसळ करणाऱ्यांना जामीन मिळूच नये, अशी कठोर तरतूद राज्य सरकार त्या कायद्यात करणार आहे. या प्रस्तावित कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागासोबत डेयरी विभागाचे आणि पोलीस दलाचे अधिकारी संयुक्त पथकांमध्ये सहभागी केले जातील, असेही आत्राम म्हणाले. 

राष्ट्रवादी काँग्रेसला येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीच्या जागा वाटपातून किमान 90 जागा हव्या आहेत. या जागा आम्हाला महायुतीला जिंकवण्यासाठी हव्या आहेत असेही आत्राम म्हणाले. लवकरच अजितदादा पवार यांचा राज्यव्यापी दौरा सुरू होणार असून त्यानिमित्ताने ते विदर्भातही येतील, अशी माहिती ही आत्राम यांनी दिली. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोट्यवधी भारतीयांना रडवणारा मॅक्सवेलचा 'तो' चौकार ते केएल राहुलनं मॅक्सवेलला मारलेला षटकार, टीम इंडियाकडून व्याजासह परतफेड
चौकार मारत मॅक्सवेलनं भारताकडून वर्ल्ड कप हिरावलेला, राहुलनं त्यालाच षटकार ठोकत धोनी स्टाईलनं ऑस्ट्रेलियाला घरी पाठवलं
दिवसाढवळ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीचे शाळेसमोरूनच अपहरण, अकोल्यातील घटनने खळबळ
दिवसाढवळ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीचे शाळेसमोरूनच अपहरण, अकोल्यातील घटनने खळबळ
Virat Kohli Ind vs Aus : 'आता या गोष्टी मला महत्त्वाच्या नाहीत...' टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचवल्यानंतर विराट कोहली असं का म्हणाला?
'आता या गोष्टी मला महत्त्वाच्या नाहीत...' टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचवल्यानंतर विराट कोहली असं का म्हणाला?
Walmik Karad: पायात चप्पल न घालणाऱ्या वाल्मिक कराडकडे गोल्डन कलरचा आयफोन 16 प्रो, पोलिसांनी डेटा रिकव्हर करताच सत्य समोर आलं
सीआयडीला वाल्मिक कराडच्या आयफोनमधील डिलिट झालेला डेटा सापडला अन् घबाड समोर आलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : 05 March 2025 : ABP MajhaTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्या : 6.30 AM : 05 March 2025 :  ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6 AM : 5 March 2025 : ABP MajhaSpecial Report Abu Azami Statement:औरंगजेबाचं उदात्तीकरण भोवणार?अबू आझमींवर निलंबनाची कारवाई होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोट्यवधी भारतीयांना रडवणारा मॅक्सवेलचा 'तो' चौकार ते केएल राहुलनं मॅक्सवेलला मारलेला षटकार, टीम इंडियाकडून व्याजासह परतफेड
चौकार मारत मॅक्सवेलनं भारताकडून वर्ल्ड कप हिरावलेला, राहुलनं त्यालाच षटकार ठोकत धोनी स्टाईलनं ऑस्ट्रेलियाला घरी पाठवलं
दिवसाढवळ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीचे शाळेसमोरूनच अपहरण, अकोल्यातील घटनने खळबळ
दिवसाढवळ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीचे शाळेसमोरूनच अपहरण, अकोल्यातील घटनने खळबळ
Virat Kohli Ind vs Aus : 'आता या गोष्टी मला महत्त्वाच्या नाहीत...' टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचवल्यानंतर विराट कोहली असं का म्हणाला?
'आता या गोष्टी मला महत्त्वाच्या नाहीत...' टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचवल्यानंतर विराट कोहली असं का म्हणाला?
Walmik Karad: पायात चप्पल न घालणाऱ्या वाल्मिक कराडकडे गोल्डन कलरचा आयफोन 16 प्रो, पोलिसांनी डेटा रिकव्हर करताच सत्य समोर आलं
सीआयडीला वाल्मिक कराडच्या आयफोनमधील डिलिट झालेला डेटा सापडला अन् घबाड समोर आलं
Sangli Murder : अल्पवयीन मुलीची छेड काढली, मामाने भाच्याच्या डोक्यात दगड घालून हत्या केली, सांगलीतील घटना
अल्पवयीन मुलीची छेड काढली, मामाने भाच्याच्या डोक्यात दगड घालून हत्या केली, सांगलीतील घटना
Gold Rate : डोनाल्ड ट्रम्प इफेक्टमुळं सोने चांदी दरात तेजी, 1100 रुपयांनी सोनं महागलं, चांदींचे दर 1 लाखांच्या जवळ
Gold Rate : डोनाल्ड ट्रम्प इफेक्ट सोने अन् चांदीच्या दरांवर, 1100 रुपयांनी सोनं महागलं, चांदींचे दर 1 लाखांच्या जवळ
IND vs AUS : रोहितसेनेनं 14 वर्षांचा दुष्काळ संपवला, ऑस्ट्रेलियाला नॉकआऊटमध्ये पाणी पाजलं, टीम इंडिया दणक्यात फायनलमध्ये, सुनंदन लेले म्हणतात..
टीम इंडियानं सांघिक कामगिरीचं बळ दाखवलं, ऑस्ट्रेलियाला लोळवलं, फायनलमध्ये दणक्यात एंट्री
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात काही तासात 3000 रुपये येणार, फेब्रुवारी मार्चचे पैसे एकत्र मिळणार, आदिती तटकरेंची मोठी घोषणा
कोट्यवधी लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज,फेब्रुवारी मार्चचे पैसे एकत्र देणार,3000 खात्यात येणार, आदिती तटकरेंची मोठी घोषणा 
Embed widget