(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mhada Paper : म्हाडा पेपरफुटीचे धागेदोरे जळगावात; आर्थिक गुन्हे शाखेकडून वकिलाला अटक
Mhada Paper Leak : म्हाडा भरती परीक्षा घोटाळ्यातील आणखी एका आरोपीला पुणे पोलिसांनी जळगावमधून अटक केली आहे.
Mhada Paper Leak : राज्यात खळबळ उडवलेल्या म्हाडा पेपरफुटीचे धागेदोरे जळगावमध्ये मिळाले आहेत. जळगावमधील अॅड. विजय दर्जी यांना अटक करण्यात आली आहे. यामुळे जळगावमध्ये खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी ही कारवाई केली आहे.
जळगाव शहरामधील बालाजी प्लेसमेंटचे संचालक विजय दर्जी यांना म्हाडाच्या पेपरफुटी प्रकरणी जळगावातून यांना अटक करण्यात आली. जळगावातील गोलाणी मार्केटमध्ये विजय दर्जी यांची बालाजी प्लेसमेंट नावाने शाखा आहे. याद्वारे सुशिक्षीत तरुणांना नोकरी देण्याचे काम ते करतात. राज्यात शिक्षकांच्या टीईटी घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. यात म्हाडा पेपरफुटीचे प्ररकणही समोर आले आहे. या प्रकरणात दर्जींच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याची चौकशी काही महिन्यांपूर्वी झाली होती. त्यानंतर बुधवारी पुणे पोलीस जळगावात धडकले. अॅड. विजय दर्जींची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. आरोपी दर्जी यांना पुणे कोर्टात हजर करण्यात आले.
म्हाडा भरती पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात इतर परीक्षांमध्येही घोटाळे झाले असल्याचे समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याचाही तपास करण्यास सुरुवात केली. त्यात अनेक धागेदोरे सापडले असून पोलिसांनी काही आरोपींना याआधीच अटक केली आहे.
मागील वर्षी डिसेंबर महिन्यात म्हाडामध्ये भरती परीक्षा होणार होती. मात्र, त्याचा पेपर फुटल्याची माहिती समोर आल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली. जीए सॉफ्टवेअर कंपनीकडे परीक्षेची जबाबदारी होती. पण या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं गोपनीयतेचा भंग करून पेपर फोडण्याचा कट रचल्याचं उघडकीस आलं होतं.
म्हाडाच्या पेपरफुटीचे मराठवाडा कनेक्शन, प्रकरण असं घडलं...
औरंगाबादमध्ये सरकारी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये परिचित असलेले गणिताचे प्राध्यापक अजय चव्हाण आणि सक्षम अॅकॅडमीचा संचालक कृष्णा जाधव, अंकित चनखोरे हे त्यांच्या अकॅडमीमधील विद्यार्थ्यांसाठी रॅकेटच्या प्रमुख सुत्रधाराकडून पेपर विकत घेणार होते. औरंगाबादच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शहरात मागील काही वर्षांमध्ये स्पर्धा परीक्षेच्या क्लासेसची वाढती संख्या आणि क्रमाने स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचा आकडा वाढवण्यासाठी आता क्लासेस चालक आधीच पेपर विकत घेण्याच्या घोटाळ्यात सहभागी होत असल्याचे समोर आले आहे. या परीक्षेच्या आयोजनाचे कंत्राट जी.ए.सॉफ्टवेअर कंपनीला देण्यात आली होती. या कंपनीचा संचालक डॉ. प्रितीश देशमुख यांनीच पेपर फोडल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यांनी रॅकेट उघडकीस आणले.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI