एक्स्प्लोर

मेडिकल आणि डेंटल पीजी प्रवेशाचा पुन्हा अंतिम कौन्सिलिंग राऊंड

मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने लागू झालेल्या आणि राज्य सरकारने लागू केलेल्या 10 टक्के आर्थिकदृष्ट्या मागास खुल्या प्रवर्गातील (EWS) आरक्षणावर स्थगिती आणल्याने पुन्हा एकदा मेडिकल प्रवेशाबाबत पेच निर्माण झाला होता.

मुंबई : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाचा पुन्हा एक अंतिम कौन्सिलिंग राऊंड घेण्यात यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्र सीईटी सेलला दिले आहेत. त्यानुसार खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसोबतच आर्थिकदृष्ट्या मागास खुल्या प्रवर्गात ज्यांनी प्रवेश घेतले होते अशा विद्यार्थ्यांना या कौन्सिलिंग राऊंडला सामोरे जावे लागणार आहे. या राऊंडमध्ये मेरिटनुसार विद्यार्थ्यांना कौन्सिलिंग राऊंडमध्ये मेडिकल आणि डेंटल अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणार आहे. मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने लागू झालेल्या आणि राज्य सरकारने लागू केलेल्या 10 टक्के आर्थिकदृष्ट्या मागास खुल्या प्रवर्गातील (EWS) आरक्षणावर स्थगिती आणल्याने पुन्हा एकदा मेडिकल प्रवेशाबाबत पेच निर्माण झाला होता. राज्यात EWS आरक्षण लागू करताना मेडिकल आणि डेंटल अभ्यासक्रमाच्या जागा वाढवून देणे हे राज्य सरकारसाठी अनिवार्य होते. मेडिकल आणि डेंटलच्या जागा न वाढवता EWS आरक्षण लागू केल्यानंतर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी हे सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने EWS आरक्षणावर पीजी मेडिकल प्रवेशावेळी स्थगिती आणली. त्यामुळे EWS प्रवर्गातील जवळपास 140 विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर स्थगिती आली होती. चार जूनपर्यंत EWS आणि खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कॉलेज पसंती क्रमांक भरण्यासाठी सीईटी सेलने मुदत दिली होती. मात्र, त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एका कौन्सिलिंग राउंडचे निर्देश दिले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जात भरलेले कॉलेज पसंती क्रमांक तसेच ठेवून या कौन्सिलिंग राउंडला जायचं आहे. ही सर्व प्रवेश प्रक्रिया 14 जूनपर्यंत पूर्ण करून विद्यार्थ्यांना मेरिटनुसार प्रवेश देण्यात यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Updates: वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार; मुंबई, पुणे, ठाणे आणि कोकणासह 30 जिल्ह्यांना आज यलो अलर्ट, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार; मुंबई, पुणे, ठाणे आणि कोकणासह 30 जिल्ह्यांना आज यलो अलर्ट, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
Dadar Best Bus Accident : डोळ्यात सुखी संसाराची स्वप्नं, घरात लग्नाची लगबग; पण काळानं घात केला अन् दादर बेस्ट बस अपघातात एका क्षणात सर्वस्व गमावलं!
डोळ्यात सुखी संसाराची स्वप्नं, घरात लग्नाची लगबग; पण काळानं घात केला अन् दादर बेस्ट बस अपघातात एका क्षणात सर्वस्व गमावलं!
Maharashtra Live blog updates: गोरेगावच्या नेस्को ड्रग्स प्रकरणी राज्य सरकारचा मुंबई उच्च न्यायालयात मोठा दावा
Maharashtra Live blog updates: गोरेगावच्या नेस्को ड्रग्स प्रकरणी राज्य सरकारचा मुंबई उच्च न्यायालयात मोठा दावा
Vasai Crime News: इमारतीपर्यंत पाठलाग केला, मग हळूच महिलेच्या फ्रॅाकमध्ये खालून हात घातला; वसईमधील धक्कादायक प्रकार, रात्री 10.45 वाजता काय घडलं?
इमारतीपर्यंत पाठलाग केला, मग हळूच महिलेच्या फ्रॅाकमध्ये खालून हात घातला; वसईमधील धक्कादायक प्रकार

व्हिडीओ

Sanbhajinagar District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची एन्ट्री? नेत्यांच्या नातलगांचीच चर्चा | ABP Majha
Sai Baba Temple Prasad Adulterated Pedha FDA Raid : साईंच्या भक्तांशीभेसळीचा खेळ | Special Report
Girish Mahajan On Operation Blue Star : महाजनांच्या अमृतसरमधील विधानावरून वाद | Special Report
INDIA Alliance Meeting : पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करा; ठाकरेंची मागणी | Special Report
Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: गोरेगावच्या नेस्को ड्रग्स प्रकरणी राज्य सरकारचा मुंबई उच्च न्यायालयात मोठा दावा
Maharashtra Live blog updates: गोरेगावच्या नेस्को ड्रग्स प्रकरणी राज्य सरकारचा मुंबई उच्च न्यायालयात मोठा दावा
Financial Freedom : आजच नोकरीपासून कायमची सुटका! जाणून घ्या तुमचा 'फ्रीडम नंबर'; अफाट पैसा कमावून निवृत्ती घेण्याचं सोपं गणित
आजच नोकरीपासून कायमची सुटका! जाणून घ्या तुमचा 'फ्रीडम नंबर'; अफाट पैसा कमावून निवृत्ती घेण्याचं सोपं गणित
Gold vs US Dollar : आपण सोनं खरेदी करतो तेव्हा अमेरिकन डॉलर कमकुवत होतो का? समजून घ्या यामागचं चक्रव्यूह!
आपण सोनं खरेदी करतो तेव्हा अमेरिकन डॉलर कमकुवत होतो का? समजून घ्या यामागचं चक्रव्यूह!
अपयशाचं बिल गरिबांच्या माथी मारणे हेच मोदींच्या लुटीचे मॉडेल, LPG सिलेंडरच्या दरावरु राहल गांधींचा हल्लाबोल
अपयशाचं बिल गरिबांच्या माथी मारणे हेच मोदींच्या लुटीचे मॉडेल, LPG सिलेंडरच्या दरावरु राहल गांधींचा हल्लाबोल
Share Market : बाजारात व्ही-शेप रिकव्हरी! ओला इलेक्ट्रिकसह 'हे' 3 शेअर्स ब्रेकआउटमुळे चर्चेत
बाजारात व्ही-शेप रिकव्हरी! ओला इलेक्ट्रिकसह 'हे' 3 शेअर्स ब्रेकआउटमुळे चर्चेत
धोंड्याच्या महिन्यात जावयासह लेकीचाही मान; पुण्यात सुनेलाही धोंडे दान, चक्क चांदीच्या चप्पल भेट
धोंड्याच्या महिन्यात जावयासह लेकीचाही मान; पुण्यात सुनेलाही धोंडे दान, चक्क चांदीच्या चप्पल भेट
आता, माझ्याकडून वाद मिटलाय, विषय संपलाय; सोसायटीमधील पांढऱ्या पट्टीवर अखेर रंगकाम, प्रसाद वेदपाठकची पोस्ट
आता, माझ्याकडून वाद मिटलाय, विषय संपलाय; सोसायटीमधील पांढऱ्या पट्टीवर अखेर रंगकाम, प्रसाद वेदपाठकची पोस्ट
वीज कोसळून बैल मेला, माय जुंपली नांगराला; शेतकरी दाम्पत्याचा पोटात कालवणारा व्हिडिओ व्हायरल, सर्वत्र हळहळ
वीज कोसळून बैल मेला, माय जुंपली नांगराला; शेतकरी दाम्पत्याचा पोटात कालवणारा व्हिडिओ व्हायरल, सर्वत्र हळहळ
Embed widget