(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Measles Disease : राज्यातील गोवर रुग्णांची संख्या 836 वर; टास्क फोर्सच्या बैठकीत अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना
Measles Disease : मागील चार वर्षांच्या तुलनेत यावर्षी राज्यात गोवरची परिस्थिती फारच चिंताजनक झाली आहे.
Measles Disease : राज्यात गोवरचा उद्रेक कमी न होता वाढतंच चालला आहे. शहरात तर गोवर संसर्ग पोहोचलाच आहे मात्र, आता गावामध्येही गोवर संसर्ग झालेले रूग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे राज्यात चिंता वाढू लागली आहे. काल राज्यात 96 पटींनी वाढला होता. आज हा आकडा 101 वर पोहोचला आहे. तर, 13 हजार 248 संशयित रूग्ण आढळले आहे. गोवरची वाढती रूग्णसंख्या पाहून आज गोवर राज्य टास्क फोर्सची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
काय झालं टास्क फोर्सच्या बैठकीत?
- ताप-पुरळ रूग्णांचे सर्वेक्षण
- राज्यातील गोवर हॉट स्पॉटचा शोध
- 9 महिने ते 5 वर्ष वयोगटातील बालकांसाठी विशेष लसीकरण अभियान
- कुपोषित बालकांकडे विशेष लक्ष
- राज्यातील सर्वांसाठी गोवर उपचार मार्गदर्शक सूचना
राज्यातील गोवरची स्थिती काय आहे?
मागील चार वर्षांची राज्याची गोवरची परिस्थिती पाहता यावर्षी म्हणजेच 2022 या वर्षातील गोवरची परिस्थिती फारच चिंताजनक झाली आहे. 2019 मध्ये गोवरचा उद्रेक तीन पटींनी झाला होता. तर, 2020 मध्ये गोवरचा उद्रेक दोन पटींवर होता. 2021 मध्ये तर गोवर बाधित रूग्णांची संख्या आतापर्यंतची सर्वात कमी म्हणजेच एक पटींनी वाढली होती. 2022 मध्ये गोवर आजाराने कहरच केला आहे. ही संख्या आता 101 पटींनी वाढली आहे.
गोवर संसर्गाची लक्षणे कोणती? (Symptoms of Measles Infection) :
गोवर हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा लसीकरणामुळे टाळता येणारा आजार आहे. गोवर हा आजार मुख्य करून पाच वर्षांखालील मुलांमध्ये आढळतो. गोवर आजारात सुरुवातीला तीव्र ताप येणे, खोकला, सर्दी अशी लक्षणे अशी लक्षणे आढळून येतात. तर, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी साधारण लालसर पुरळ अंगावर येण्यास सुरुवात होते. काही मुलांना जुलाब, उलटीचा सुद्धा त्रास होतो. हा ताप साधारण पाच ते सात दिवस अंगावर राहतो. यामध्ये काही मुलांना तीव्र श्वसनदाह, न्यूमोनिया, मेंदूवर सूज, एन्केफेलायटीस, अंधत्व, अशा समस्या उद्भवू शकतात. तसेच, यामध्ये मुलं दगावण्याची सुद्धा भीती असते.
महत्त्वाच्या बातम्या :
Aurangabad Measles Updates: गोवरने औरंगाबादकरांची चिंता वाढवली, संशयित रुग्णांचा आकडा 'शंभरीपार'