एक्स्प्लोर

हातकणंगले मतदारसंघात ज्ञानेश्वर मुळे विरुद्ध राजू शेट्टींची लढत?

देशाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सचिवपदाची धुरा सांभाळणारे ज्ञानेश्वर मुळे हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील लाट या गावचे आहेत.

पुणे: प्रसिद्ध प्रशासकीय अधिकारी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे हे येत्या लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे. सध्या देशाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सचिवपदाची धुरा सांभाळणारे ज्ञानेश्वर मुळे हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील लाट या गावचे आहेत. त्यामुळे आपल्याच मतदारसंघातून ते लोकसभा निवडणूक लढवण्याची चिन्हं आहेत. जर त्यांनी निवडणूक लढवण्याचं निश्चित केलं, तर हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यासमोर ज्ञानेश्वर मुळे यांचं कडवं आव्हान असेल. मात्र याबाबत ज्ञानेश्वर मुळे यांनी अधिकृत होकार किंवा नकार दिलेला नाही. ज्ञानेश्वर मुळे यांच्या  'माती, पंख नि आकाश', 'पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया', 'शांती की अफवांए', 'होतच नाही सकाळ',  ज्ञानेश्वर मुळे की कविताएः प्रातिनिधीक संकलन या पुस्तकांचं प्रकाशन, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आलं.  पुण्यात झालेल्या या कार्यक्रमानंतर मुळे यांनी पत्रकारांशी गप्पा मारल्या. मोहन भागवत यांच्या हस्ते पुस्तकांचं प्रकाशन झाल्यामुळे, भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावलेही यावेळी पत्रकार परिषदेला उपस्थित होते. ज्ञानेश्वर मुळे हे येत्या डिसेंबरमध्ये निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांना राजकीय प्रवेशाबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी मुळे म्हणाले, “मला वाटतं चांगल्या लोकांनी राजकारणात आलं पाहिजे. मी भाजपच्या जवळचा आहे, हा आरोप पूर्णत: चुकीचा आहे. मी सर्वपक्षांच्या नेत्यांना भेटत असतो. मी 2019 ची निवडणूक लढवण्याबाबतच्या चर्चेबद्दल बोलायचं झालंच, तर सध्य स्थितीला ना माझा होकार आहे ना नकार” कोण आहेत ज्ञानेश्वर मुळे?
  • सध्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव म्हणून कार्यरत
  • साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेला अधिकारी म्हणून परिचीत
  • कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील लाट या गावी जन्म
  •  1983 मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू
  • जपान, रशिया, मॉरीशस, सीरिया इत्यादी देशात महत्वाच्या हुद्द्यांवर काम.
  • 2009 ते 2013 पर्यंत मालदीवमध्ये भारताचे उच्चायुक्त होते
  • 2013 ते 2016 दरम्यान भारताचे अमेरिकेतील राजदूत म्हणून काम
  • मुळे यांचं 'माती,पंख आणि आकाश' हे आत्मचरित्र तरुणांसाठी प्रेरणादायी
  • जवळपास 15 पेक्षा जास्त पुस्तकांचं लेखन
  • मुळे यांच्या पुस्तकांचं हिंदी, उर्दू, कन्नड, अरेबीत भाषांतर
  • नागरिकांना जलद आणि सहज पासपोर्ट उपलब्ध करुन देण्याची संकल्पना मुळे यांचीच
  • पासपोर्टची प्रक्रिया सुलभ करण्याचा काम मुळे यांनी केलं.
संबंधित बातम्या

कोल्हापुरात पहिलं पोस्ट ऑफिस पासपोर्ट केंद्र!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMahayuti vs MVA : निवडणुकीआधी वक्तव्यांचा 'जिहाद'? महायुतीची रणनीती काय? Special ReportZero Hour Shinde Fadnavis on Hindu Votes : हिंदू मतांच्या एकत्रीकरणासाठी शिंदे-फडणवीसांच्या भेटीगाठीZero Hour MVA And Mahayuti : महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपासाठी खलबतं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
Embed widget