लोकप्रियतेसाठीच मंत्री घोषणा करतात, मुलींना मोफत शिक्षणाच्या मुद्यावरुन सुप्रिया सुळेंचा चंद्रकांत पाटलांना टोला
Supriya Sule on Chandrakant Patil : मुलींना मोफत शिक्षण देण्याच्या मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी ( Supriya Sule) चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केलीय.
Supriya Sule on Chandrakant Patil : राज्यात 1 जूनपासून मुलींना मोफत शिक्षण (Free education for girls) मिळणार, अशी घोषणा तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली होती. मात्र, आता जून महिना उलटत आला तरी याची अंमलबजावणी झालेली नाही. याच मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी ( Supriya Sule) चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केलीय. याबाबत एबीपी माझाने बातमी दाखवल्यांनंतर हीच बातमी सोशल माध्यमांत शेअर करत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारवर टीका केलीय. सवंग लोकप्रियतेसाठी सरकार अन् मंत्री केवळ घोषणा करतात असा टोला सुळेंनी लगावला.
लोकप्रियतेसाठी मंत्री केवळ घोषणा करतात
मुलींना मोफत शिक्षणाच्या घोषणेवरुन सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांत पाटील अन सरकारवर जोरदार निशाणा साधला. एबीपी माझाची बातमी शेअर करत सुप्रिया सुळेंनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. सवंग लोकप्रियतेसाठी सरकार अन मंत्री केवळ घोषणा करतात ही अत्यंत खेदाची अन निषधार्ह बाब असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. राज्यात 1 जूनपासून मुलींना मोफत शिक्षण मिळणार अशी घोषणा तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. मात्र, अद्यापही या घोषणेची अंमलबजावणी झाली नाही. याच मुद्यावरुन सुळे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली.
विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये आणि महाविद्यालयांमध्येही संभ्रमाचे वातावरण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली होती. या घोषणेनुसार आठ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील मुलींना वैद्यकीय, अभियांत्रिकी यांसह 662 अभ्यासक्रमांना मोफत प्रवेश मिळणे अपेक्षित होते. परंतु याबाबत कॅबीनेटमध्ये चर्चा झाली किंवा तशा आशयाचा शासन निर्णय वगैरे प्रकाशित झाल्याचे दिसून येत नाही. यामुळे यावर्षी सदर अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये तसेच महाविद्यालयांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे. खुद्द मंत्री महोदयांनी ही घोषणा केल्यामुळे त्याचे गांभीर्य आहे. परंतु अद्याप याबाबत काहीच झालेले दिसत नसल्याचे सुळे म्हणाल्या. ही अत्यंत खेदाची अन निषधार्ह बाब असल्याचेही सुळेम्हणाल्या आहे. त्यमुळं आता सुळेंच्या टीकेवर चंद्रकांत पाटील काय बोलणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
Chandrakant Patil : मोठी बातमी! 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींचे उच्च शिक्षण मोफत होणार, चंद्रकांत पाटील यांनी दिल्या सूचना
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI