MBBS पेपरफुटीबाबत मोठी अपडेट, अज्ञात व्यक्तीविरोधात दुसरा गुन्हा, फार्मकॉलॉजी नंतर पॅथॉलॉजी 1ही लीक झाल्याचे समोर
MBBS paper leak Update:या प्रकरणाच्या तपासासाठी विद्यापीठ, महाविद्यालय, आणि पोलिस प्रशासन एकत्रितपणे कार्यरत असून, पुढील तपास सुरू आहे.एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाच्या हिवाळी सत्राची सुरू होती.
MBBS paper leak Update: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (MUHS) एमबीबीएस द्वितीय वर्षाच्या परीक्षांमध्ये पेपर फुटीचा दुसरा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फार्मकॉलॉजी 1 या विषयाचा पेपर फुटी प्रकरणाचा तपास सुरू असतानाच पॅथॉलॉजी 1 विषयाचा पेपर देखील लीक झाल्याची माहिती समोर येताच आता या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरोधात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्यापीठाला प्राप्त झालेल्या माहितीनुसार,फार्मकॉलॉजी 1 या विषयाचा पेपर फुटी प्रकरणाचा तपास सुरू असतानाच पॅथॉलॉजी 1 विषयाचा पेपर देखील लीक झाल्याची माहिती विद्यापीठाला मिळाली. या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे विद्यापीठाच्या वतीने म्हसरुळ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यापीठाने पेपर फुटी प्रकरणांच्या तपासासाठी विशेष चौकशी समिती नेमली आहे. या समितीने प्राथमिक तपासात महत्त्वाचे धागेदोरे उघड केले असून, सखोल तपासासाठी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पेपर फुटीमुळे परीक्षा प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे.या प्रकरणाच्या तपासासाठी विद्यापीठ, महाविद्यालय, आणि पोलिस प्रशासन एकत्रितपणे कार्यरत असून, पुढील तपास सुरू आहे.एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाच्या हिवाळी सत्राची सुरू होती.
विद्यापीठाची डोकेदुखी वाढली
2 डिसेंबर रोजी दुपारच्या सत्रात होणाऱ्या एमबीबीएस परीक्षेचा MCQ स्वरूपातील पेपर परीक्षा सुरू होण्याच्या सुमारे एक तास आधी व्हायरल झाला होता. विद्यापीठाला या प्रकाराची माहिती ईमेलद्वारे मिळताच तातडीने परीक्षा रद्द करण्यात आली. राज्यभरातील 50 केंद्रांवर सुमारे 7 हजार 900 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. परंतु पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेचा ताण सहन करावा लागणार आहे. या लिकची माहिती विद्यापीठाला ईमेलद्वारे मिळाली. ईमेलच्या स्त्रोताची तपासणी करण्यासाठी आणि संपूर्ण डिजिटल ट्रेलसाठी विद्यापीठ सायबर सेलचा समावेश करण्यात आला आहे. पेपर फुटल्याने विद्यापीठाची डोकेदुखी वाढली आहे.