Matheran : 'थंड' माथेरानमध्ये राजकारण तापलं! ठाकरे गटाच्या शहरप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
Matheran Crime Update : थंड हवेच्या ठिकाण म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये Matheran राजकारण मात्र तापायला लागलं आहे. या मागे कारण ही तसंच आहे.
Matheran Crime Update : माथेरान (Matheran) म्हणजे कोकणातलं एक आवडतं आणि चर्चित पर्यटनस्थळ. थंड हवेच्या ठिकाण म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये राजकारण मात्र तापायला लागलं आहे. या मागे कारण ही तसंच आहे. माथेरान येथील शिवसेनेचे शहर प्रमुख आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे प्रसाद सावंत (Shiv Sena Prasad Sawant) यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सावंत यांना फोन कॉल वर धमकी आल्याने माथेरान तसेच कर्जत परिसरात राजकारण (Political News) पुन्हा एकदा तापलं आहे. विशेष म्हणजे सावंत यांच्यावर काही दिवसांपूर्वीच जीवघेणा हल्ला देखील झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दुपारच्या सुमारास अज्ञात इसमाने माथेरान शहराचे (Matheran City) शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गटाच्या) शहर प्रमुख प्रसाद सावंत याना फोनवरून अश्लील शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी सावंत यांनी माथेरान पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात इसमाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान गेल्या महिनाभरापूर्वी प्रसाद सावंत यांच्यावर कर्जत येथे 12 ते 14 जणांनी भररस्त्यात गाडी अडवत जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात सावंत हे गंभीर जखमी झाले होते.
आदित्य ठाकरे सावंत यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी गेले होते रुग्णालयात
सावंत यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना आदित्य ठाकरे सावंत यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी रुग्णालयात गेले होते. या घटनेनंतर कर्जत पोलिसांनी गुन्हा नोंद करून 14 पैकी 5 आरोपींना अटक केलं होतं. मात्र उर्वरित आरोपींना अटक करावी यासाठी रायगडचे पोलीस अधीक्षकांना वारंवार लेखी पत्राद्वारे मागणी करत होते.
रायगड पोलिसांनी उर्वरित आरोपींना लवकरात लवकर अटक
याचाच राग मनात धरून आरोपीने फोनवर जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रसाद सावंत यांनी म्हटलं आहे. मात्र पोलिसांवर दबाव असल्यामुळे आरोपी हे मोकाट फिरत आहेत. तसेच जीवे ठार मारण्याची खुलेआम धमकी ही देत आहेत. म्हणून रायगड पोलिसांनी उर्वरित आरोपींना लवकरात लवकर अटक करावी. अन्यथा जर माझं आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांचा जीवाचं काही बर वाईट झालं तर याला जबाबदार कोण असणार? असा प्रश्न या निमित्ताने प्रसाद सावंत यांनी उपस्थित केलाय.