Marathwada Rain Update : मराठवाड्यातील धरणात केवळ 42.79 टक्के पाणीसाठा, विभागात 84 टँकरने पाणीपुरवठा
Marathwada Rain : विभागात यावर्षी आजपर्यंत 336 मिमी पाऊस झाला असून, गतवर्षी आजच्या तारखेला 528 मिमी पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली होती.
Marathwada Rain Update : पावसाने (Rain) दडी मारल्याने मराठवाड्याची (Marathwada) चिंता वाढली आहे. विभागात यावर्षी आजपर्यंत 336 मिमी पाऊस झाला असून, गतवर्षी आजच्या तारखेला 528 मिमी पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली होती. तसेच गेल्यावर्षी आजच्या तारखेत मराठवाड्यातील 11 मोठ्या धरणात एकूण 86.67 टक्के पाणीसाठा होता. मात्र, आज याच धरणांमध्ये 42.79 टक्के पाणीसाठा आहे. म्हणजेच गेल्या वर्षाच्या तुलनेत 43.88 टक्के पाणीसाठ्याची घट आहे. याचा परिणाम आता पाणी टंचाईवर जाणवत असून, मराठवाड्यातील औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यात 84 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
मराठवाड्यातील पावसाची स्थिती
औरंगाबाद जिल्हा:
गतवर्षी आजच्या दिवशी: 403 मिमी
यावर्षी आजच्या दिवसापर्यंत : 247 मिमी
जालना जिल्हा:
गतवर्षी आजच्या दिवशी: 492.8 मिमी
यावर्षी आजच्या दिवसापर्यंत : 253.7 मिमी
बीड जिल्हा:
गतवर्षी आजच्या दिवशी: 396.1 मिमी
यावर्षी आजच्या दिवसापर्यंत: 241.6 मिमी
उस्मानाबाद जिल्हा:
गतवर्षी आजच्या दिवशी: 419.9 मिमी
यावर्षी आजच्या दिवसापर्यंत: 269.9 मिमी
नांदेड जिल्हा:
गतवर्षी आजच्या दिवशी: 802.9 मिमी
यावर्षी आजच्या दिवसापर्यंत: 580.6 मिमी
हिंगोली जिल्हा:
गतवर्षी आजच्या दिवशी: 637.7 मिमी
यावर्षी आजच्या दिवसापर्यंत: 430.8 मिमी
मराठवाड्यातील 11 मोठ्या धरणातील पाणीसाठा स्थिती
जायकवाडी
गतवर्षी आजच्या दिवशी: 95.43 टक्के
यावर्षी आजच्या दिवसापर्यंत: 34.28 टक्के
विष्णुपुरी
गतवर्षी आजच्या दिवशी: 77.45 टक्के
यावर्षी आजच्या दिवसापर्यंत: 82.68 टक्के
एलदरी
गतवर्षी आजच्या दिवशी: 86.09 टक्के
यावर्षी आजच्या दिवसापर्यंत: 59.97 टक्के
सिद्धेश्वर
गतवर्षी आजच्या दिवशी: 96.37 टक्के
यावर्षी आजच्या दिवसापर्यंत: 44.30 टक्के
निम्न दुधना
गतवर्षी आजच्या दिवशी: 68.57 टक्के
यावर्षी आजच्या दिवसापर्यंत: 27.08 टक्के
माजलगाव
गतवर्षी आजच्या दिवशी: 55.33 टक्के
यावर्षी आजच्या दिवसापर्यंत: 14.90 टक्के
मांजरा
गतवर्षी आजच्या दिवशी: 42.43 टक्के
यावर्षी आजच्या दिवसापर्यंत: 26.35 टक्के
निम्न तेरणा
गतवर्षी आजच्या दिवशी: 89.38 टक्के
यावर्षी आजच्या दिवसापर्यंत: 29.36 टक्के
सीना कोळगाव
गतवर्षी आजच्या दिवशी: 00 टक्के
यावर्षी आजच्या दिवसापर्यंत: 00 टक्के
पेनगंगा
गतवर्षी आजच्या दिवशी: 93.90 टक्के
यावर्षी आजच्या दिवसापर्यंत: 64.05 टक्के
मनार
गतवर्षी आजच्या दिवशी: 100 टक्के
यावर्षी आजच्या दिवसापर्यंत: 51.27 टक्के
एकूण
गतवर्षी आजच्या दिवशी: 86.67 टक्के
यावर्षी आजच्या दिवसापर्यंत: 42.79 टक्के
इतर महत्वाच्या बातम्या:
Jayakwadi Water Storage Update : जायकवाडी धरणात केवळ 34 टक्के पाणीसाठा; मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट