भीषण! मराठवाड्यात दोन दिवसात पावसानं 12 ठार, तीन जिल्ह्यात 5 लाख 8 हजार 68 हेक्टर पिकांचे नुकसान
मराठवाड्यात मागील 48 तासांपासून मुसळधार पावसामुळे ओढे आणि नद्यांना पूर आलाय. शेतात पाणी घुसल्याने पिकांचे नुकसान झालंय. नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
Marathwada Rain Damage: मराठवाड्यात मागील दोन दिवसात बेफाम पावसाने 12 ठार झाले आहे. पावसानं दाणादाण उडाली असून परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात 5 लाख 8 हजार 68 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहेत. गेल्या दोन दिवसात अर्ध्याहून अधिक महसूलमंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली असून पुरात वाहून, पाण्यात बुडून तसेच वीज पडल्याने 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
मराठवाड्यात मागील 48 तासांपासून मुसळधार पावसामुळे ओढे आणि नद्यांना पूर आलाय. शेतात पाणी घुसल्याने पिकांचे नुकसान झालंय. नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. घरांची पडझड झाली आहे. बीड नांदेड परभणी लातूर जिल्ह्यात रात्रीपासून पावसाचा जोर कायम आहे. सखल भागात पाणी हळूहळू शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. ढगफुटीसदृश्य झालेल्या पावसानं रौद्ररूप धारण केला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
6 लाखाहून अधिक शेतकरी बाधित
मराठवाड्यात पावसाच्या कोसळधारांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. 4 लाख 96 हजार 392 हेक्टर जिरायत क्षेत्राचे नुकसान झाले असून 11 हजार 497 बागायत हेक्टर पावसानं नासलं आहे. सहा लाखांहून अधिक शेतकरी पावसाच्या पाण्यानं बाधित झाले आहेत. दोन दिवसाच्या पावसात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १ जालना २ हिंगोली, बीड, लातूर जिल्ह्यात प्रत्येकी एक जण मृत झाला असून कालच्या पावसात ही आकडेवारी वाढून १२ वर गेली आहे.
1 हजार 454 गावांमध्ये नुकसान
मराठवाड्यातील 1 हजार 454 गावांमध्ये नुकसान झाले असून 169 जनावरे दगावली असून 621 पुराच्या पाण्याने नुकसान झाले आहे. मुसळधार पावसानं अनेक गावांना पुराचा वेढा लागला असून अनेक नदीकाठची गावं पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे. नांदेड जिल्ह्यात गेल्या 36 तासांमध्ये पावसाचा जोर कायम असून अजूनही पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील 26 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून जिल्ह्यातील सर्व प्रकल्पातून पाणी सोडले जात आहे. नदी नाले ओसंडून वाहत असून नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमध्ये 12 जनावरे मृत्युमुखी पडली असून 21 घरांची अंशतः पडझड झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन ,कृषी,पाटबंधारे, महसूल व पोलीस विभाग स्थितीवर लक्ष ठेवून असून ज्या ठिकाणी मदतीची आवश्यकता आहे.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
प्रकल्पामध्ये सततच्या पावसामुळे वाढ होत असून नदी धरणे व बंधाऱ्यांपुढील नदीपात्रा नजीक राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहे. धरणामध्ये येणारा पाण्याचा नवीन प्रवाह. या महिन्यात धरणामध्ये ठेवायचा जलसाठा हे लक्षात घेऊन प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात येतात. त्यामुळे अतिवृष्टी झाल्यास अधिकअतिवृष्टी झाल्यास अधिक प्रमाणात पाणी सोडले जाऊ शकते. त्यामुळे या सर्व प्रकल्पाच्या खालील बाजूस असणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.