एक्स्प्लोर
पद्मश्री शब्बीर मामुंच्या गायींसाठी मराठवाडा मित्र मंडळाचा निवारा
शब्बीर मामूंना ज्यावेळेस पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याच वेळी मराठवाडा मित्र मंडळाच्या सदस्यांनी त्यांचा सत्कार करण्याचे ठरवले. पण केवळ सत्कार नाही तर असा एक काम शब्बीर मामू यांना गो संगोपनासाठी मोठा आधार ठरेल असं काम करण्याचा निर्णय मराठवाडा मित्र परिवारांना घेतला.
बीड : मागच्या चाळीस वर्षांपासून गाईंचे संगोपन करणाऱ्या सय्यद शब्बीर मामुंना नुकतेच पद्मश्री सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे. शब्बीर मामुंनी 200 गाईंचं संगोपन केलं आहे. त्यांनी स्वतःच्या संसारातून काटकसरीने 200 गाई सांभाळल्या वाढवल्या आणि खऱ्या अर्थाने ते गोपालक बनले.
कोणत्याही शासकीय अथवा खाजगी मदतीशिवाय शब्बीर मामू हे हा रहाटगाडा चालवत होते. शब्बीर मामूंकडे सध्या सव्वाशे लहान-मोठ्या गाई आहेत. पण त्यातील केवळ पंचवीस गाईंना बसता येईल एवढाच शेड शब्बीर मामू यांच्याकडे होता. हेच बघून गावापासून शेकडो किलोमीटर दूर राहणाऱ्या मुंबईतील मराठवाडा मित्र मंडळातील सदस्यांनी एकत्रित येऊन शब्बीर मामुंच्या गाईंना शेड देण्याचे ठरवले.
मराठवाडा मित्र परिवाराने हे यापूर्वी सुद्धा अनेक वेळा दाखवून दिला आहे. गावापासून शेकडो किलोमीटर दूर मुंबईसारख्या महानगरात राहून सुद्धा गावांमधल्या सगळ्या चांगल्या-वाईट समस्यांची जाणीव त्यांना असते. म्हणूनच दुष्काळ असो की महापूर अशा संकट काळात मराठवाडा मित्र परिवार धावून आला नाही असं होत नाही.
बीड पासून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरूरमध्ये गोपालक म्हणून तीन पिढ्यांपासून काम करणाऱ्या शब्बीर मामुंना ज्यावेळेस पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याच वेळी मराठवाडा मित्र मंडळाच्या सदस्यांनी त्यांचा सत्कार करण्याचे ठरवले. पण केवळ सत्कार नाही तर असा एक काम शब्बीर मामू यांना गो संगोपनासाठी मोठा आधार ठरेल असं काम करण्याचा निर्णय मराठवाडा मित्र परिवारांना घेतला.
शब्बीर मामुंच्या गाईंना निवाऱ्याची गरज होती. मराठवाडा मित्र परिवाराच्या व्हाट्सअप ग्रुपवर सहाशे सदस्य आहेत. त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्यात आली आणि मे महिन्यामध्ये गाईंच्या शेडच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. दोन महिन्याच्या अथक परिश्रमानंतर शब्बीर मामूंच्या सव्वाशे गाईंना एका छताखाली आणणारा निवारा तयार झाला.
या दोन गोठ्याचे लोकार्पण सुद्धा बीडकरांच्या कायम स्मरणात राहील बीडमध्ये समाजसेवेचा वसा घेतलेल्या दिपक नागरगोजे, दत्ता बारगजे आणि गौतम खटोड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या दोन शेडचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला.
दृष्टीक्षेपात मराठवाडा मित्रपरिवाराचे काम
मराठवाडा मित्र परिवार, नवी मुंबई ही संस्था सन 2012 पासून कार्यरत आहे. गेली सात वर्ष सातत्याने नवी मुंबई आणि परिसरातील मराठवाड्यातील लोकांना एकत्र आणून विविध सामाजिक,सांस्कृतिक कार्य अविरतपणे करत आहेत. संस्थेने 2015 मध्ये दुष्काळी परिस्थितीत बीड जिल्ह्यातील मयुर अभयारण्यातील पशुपक्षांसाठी टँकरने मोफत पाणी पुरवठा केला. लातुर जिल्ह्यातील चांडेश्वर या गावाला दुष्काळ परिस्थिती असताना 2015 साली दोन महिने मोफत पाणी पुरवठा केला. संस्थेने दुष्काळ निधी म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत केली आहे. संस्थेने नाम फाऊंडेशनला देखील पाणी नियोजन आणि दुष्काळ सहायतेसाठी आर्थिक मदतीचा हातभार लावला आहे. संस्थेमार्फत लातूर जिल्ह्यातील हासेगाव येथील एडसग्रस्त मुलांना आर्थिक मदत देऊ केली आहे. पुलवामा हल्लात शहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना देखील आर्थिक मदतीचा हात दिला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
Advertisement