Sanjay Raut:हे संपूर्ण सरकार गोट्याच खेळायच्या लायकीचं, देवेंद्र फडणवीस पेशव्यांच्या काळातील नाना फडणवीसारखे शहाणे आहेत जे जनतेची मागणी होताच.. संजय राऊतांचा हल्लाबोल
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘ओला दुष्काळ’ नाकारल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे 11 ऑक्टोबरला मराठवाड्यात शेतकऱ्यांसाठी मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.

Sanjay Raut on Devendra Fadnavis: 'ओला दुष्काळ' हा (Ola Dushkal issue Sanjay Raut vs Fadnavis) शब्द शासनाच्या शब्दकोशात नाही, असे फडणवीस म्हणत आहेत. हे फडणवीस पेशव्यांच्या काळातील नाना फडणवीस असून जे जनतेच्या मागण्या आल्या की सरकारी भाषा दाखवायचे, हे सरकार गोट्या खेळण्याच्याच लायकीचे असल्याचा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. राऊत यांनी पंजाबमधील भगवंत मान सरकारचे उदाहरण दिले. त्यांनी म्हटले की, केंद्र सरकार मदत देत नसताना पंजाब सरकारने पूर परिस्थितीत शेतकऱ्यांना खंबीरपणे मदत केली आणि 50 हजार घरे बांधून देण्याचे वचन दिले. याउलट, महाराष्ट्र सरकारने अद्याप पंचनामेही सुरू केलेले नाहीत किंवा प्राथमिक मदतही पोहोचवलेली नाही. 11 ऑक्टोबर रोजी मराठवाड्यातील शिवसेनेचे शिबिर रद्द करून, त्याचे रूपांतर मोर्चात (Uddhav Thackeray Marathwada farmers rally) करण्यात आले आहे आणि या मोर्चाचे नेतृत्व उद्धव ठाकरे करतील, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे कौतुक (Sanjay Raut on Uddhav Thackeray)
राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी चिखलात, बांधावर आणि घरात जाऊन लोकांचे दुःख समजून घेतले. राऊत यांनी सांगितले की, कळंबमध्ये एका वृद्ध महिलेने "गरीबांच्या घरात कोणी येत नाही" असे म्हटल्यावर उद्धव ठाकरे त्या महिलेचा पत्ता विचारून तिच्या वाहून गेलेल्या घरात जाऊन बसले आणि तिचे दुःख ऐकले. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना सांगितले की, "मी तुमच्यासाठी भांडतोय, कोणीही आत्महत्येचा विचार मनात आणू नये". त्यांनी शेतकऱ्यांना लढण्याचे आवाहन केले.
तुमच्या डोक्यात सडकं राजकारण (Sanjay Raut on Devendra Fadnavis)
संजय राऊत म्हणाले की, सरकार शासकीय शब्दकोशावर नाही, तर लोकभावनेवर चालते. 'ओला दुष्काळ' जाहीर करा, ही लोकभावना आहे आणि सरकारने शब्दांचे अर्थ सांगत बसू नये, असे त्यांनी सुनावले. एका शेतकऱ्याने तत्काळ मदतीबद्दल विचारले असता, फडणवीसांनी त्याला "गप बस रे, राजकारण करू नको" असे म्हटले. यावर राऊत म्हणाले की, ज्या शेतकऱ्याचे सर्वस्व वाहून गेले आहे, तो मदतीबद्दल विचारत आहे, यात राजकारण कुठे आहे? तुमच्या डोक्यात सडकं राजकारण आहे, असे राऊत फडणवीसांना म्हणाले.
उद्योगपती आणि बीसीसीआयकडून निधीची मागणी (Sanjay Raut demand funds from BCCI for farmers)
राऊत यांनी मागणी केली की, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सर्व उद्योगपतींकडून, जे त्यांच्या किंवा भाजपच्या खिशात आहेत, त्यांच्याकडून पैसे जमा करावेत. अमित शाह यांच्या मालकीच्या भारतीय क्रिकेट बोर्डाकडून (BCCI) मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ताबडतोब 2 हजार कोटी रुपये घ्यावेत, असेही ते म्हणाले.
हे संपूर्ण सरकार गोट्या खेळण्याच्याच लायकीचे (Sanjay Raut criticism on Ajit Pawar remarks)
राऊत पुढे म्हणाले, कर्जमाफीची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना अजित पवार म्हणाले की, "मी इथं गोट्या खेळायला आलो नाही". यावर राऊत यांनी म्हटले की, ही त्यांची स्टाईल नसून मग्रुरी आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मराठवाड्याचे दुःख कळलेले नाही, असे राऊत म्हणाले. तुम्ही सकाळी सहा वाजता जाऊन काय करता, असा सवाल करत, हे संपूर्ण सरकार गोट्या खेळण्याच्याच लायकीचे आहे, अशी जळजळीत टीका त्यांनी केली. ठाण्याचा डेप्युटी सीएम स्वतःचे फोटो छापून मदत करत सुटले आहेत. हे सरकार लोकांच्या मदतीसाठी नाही, तर स्वतःची कातडी वाचवण्यासाठी आलेले भ्रष्ट शासनकर्ते आहेत. त्यांना शेतकरी वाचवण्यात काहीही रस नाही, असे राऊत म्हणाले.























