Actress Dipali Sayyed: दिपाली सय्यद यांचं पाकिस्तान, दुबई कनेक्शन? गंभीर आरोप करणाऱ्या माजी स्वीय सहाय्यकाविरोधात पोलिसांत धाव
Actress Dipali Sayyed: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या दिपाली सय्यद यांनी त्यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांच्याविरोधात तक्रार केली आहे.
Actress Dipali Sayyed: अभिनेत्री दिपाली सय्यद (Dipali Sayyed) यांनी माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांच्याविरोधात मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यात (Oshiwara Police Station) तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्री दिपाली सय्यदचा पाकिस्तान (Pakistan) आणि दुबईशी (Dubai) कनेक्शन असल्याचा आरोप शिंदे यांनी केला होता. तसेच, दीपाली सय्यद यांनी ट्रस्टच्या नावाखाली अनेकांना गंडा घातल्याचाही आरोप त्यांनी केला होता. याप्रकरणी आता दिपाली सय्यद यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या दिपाली सय्यद यांनी त्यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांच्याविरोधात तक्रार केली आहे. दीपाली सय्यद यांचं पाकिस्तान आणि दुबई कनेक्शन असल्याचा दावा भाऊसाहेब शिंदे यांनी केला होता. तसेच, दिपाली यांनी सामूदायिक विवाहाच्या नावाखाली अनेक बोगस लग्न लावल्याचा आरोपही त्यांनी केला होता. दीपाली सय्यद यांनी ट्रस्टच्या नावाखाली अनेकांना गंडा घातल्याचाही आरोप शिंदे यांनी केला होता. त्या आरोपांवर दिपाली सय्यद यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण त्याच दिपाली सय्यद यांनी आज ओशिवरा पोलीस ठाण्यात जाऊन भाऊसाहेब शिंदे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
पाहा व्हिडीओ : Dipali Sayyed FULL PC : पाकिस्तान आणि दाऊदशी संबंध असल्याचे आरोप, दीपाली सय्यद म्हणाल्या...
भाऊसाहेब शिंदे यांनी काय केलेत आरोप?
अभिनेत्री दिपाली सय्यद यांचे पाकिस्तान आणि दुबई कनेक्शन असल्याचा आरोप त्यांचेच माजी स्वीय सहाय्यक यांनी केला होता. सामूदायिक विवाहाच्या नावाखाली अनेक बोगस लग्न लावल्याचाही आरोप त्यांनी केला होता. या बोगस लग्नातून त्यांनी अनेक लोकांना फसविल्याचा आरोपही माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला होता. दिपाली सय्यद यांनी ट्रस्टच्या नावाखाली अनेकांना गंडा घातला होता. ट्रस्टच्या खात्यात फक्त नऊ हजार होते, मग कोट्यवधी रुपये कुठून आले? असा प्रश्नही दिपाली सय्यद यांच्यावर आरोप करताना त्यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केले होते.
भाऊसाहेब शिंदे यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली कारवाईची मागणी
अहमदनगर (Ahmednagar) येथे आज भाऊसाहेब शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा दावा केला. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे अनेक वेळा लेखी तक्रार करून आणि पुरावे देऊनही दिपाली सय्यद यांच्यावर कारवाई होत नाही असं भाऊसाहेब शिंदे यांचं म्हणणं आहे. दीपाली सय्यद यांच्यावर कारवाई झाली नाही तर आगामी काळात गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांना राज्यात फिरू दिले जाणार नाही असा इशाराही भाऊसाहेब शिंदे यांनी दिला आहे.
दरम्यान, दिपाली सय्यद यांनी अनेक चित्रपटामध्ये काम केलं आहे. तसेच त्या राजकारणात देखील सक्रिय असतात. काळशेकर आहे का?,घुंगराच्या नादात, जाऊ तिथे खाऊ,मुंबईचा डबेवाला, होऊन जाऊ दे यांसारख्या चित्रपटांमध्ये दीपाली यांनी काम केलं आहे. दिपाली या त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात.