Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी कोणत्या विभागात किती सर्वेक्षण? सरकारसमोर नवे पर्याय निर्माण होणार?
Maratha Reservation Survey : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षण मोहीम राबावण्यात आली होती. दरम्यान 2 फेब्रुवारी रोजी ही मोहीम संपणार आहे.

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याची मोहीम हाती घेतली होती. 23 जानेवारी पासून सुरू झालेली ही मोहीम आज 2 फेब्रुवारीला मध्यरात्री बारा वाजता संपणार आहे. आतापर्यंत 95% सर्वेक्षण पूर्ण झालं असून हे सर्वेक्षण आज रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहील. त्यानंतर उद्या 10 वाजता मागासवर्ग आयोगाला सर्वेक्षण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र द्यायचं आहे.
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण हे राज्य सरकारच्या पुढे मोठं आव्हान ठरलेला आहे. त्यासाठी मागासवर्ग आयोग नेमून कामाला सुरुवात केलीय. मागासवर्ग आयोगाने पुन्हा एकदा राज्यभरातील सर्वेक्षण करायला सुरुवात केली होती. 23 फेब्रुवारीपासून सुरू केलेलं सर्वेक्षण आज रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. आणि त्यानंतर हे सर्वेक्षण बंद होणार असल्याचे आदेश राज्य मागासवर्ग आयोगाने प्रशासनाला दिले आहेत. आतापर्यंत 95% सर्वेक्षण पूर्ण झालेलं पाहायला मिळतंय. उर्वरित सर्वेक्षण आज रात्रीपर्यंत केलं जाणार असल्याची माहिती देण्यात आलीये. दरम्यान कोणच्या विभागात आतापर्यंत किती सर्वेक्षण झालंय, याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
कोणत्या विभागात आतापर्यंत किती सर्वेक्षण?
गुरुवार 1 फेब्रुवारीपर्यंत राज्यात 85 टक्के सर्वेक्षण पूर्ण झालं होतं.
कोकण विभाग - 93 टक्के
पुणे विभाग - 78.18 टक्के
नाशिक - 91 टक्के
छं. संभाजी नगर - 90 टक्के
अमरावती - 84 टक्के
नागपूर - 91.82 टक्के
मराठवाड्यात आतापर्यंत 92.87% इतका सर्वेक्षण झालं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठवाड्यातून मोठया प्रमाणावर सर्वेक्षण होताना पाहायला मिळत होतं.
मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यात किती सर्वेक्षण झालं?
छत्रपती संभाजीनगर - 65.45 टक्के
जालना - 84.38 टक्के
परभणी - 87.99 टक्के
हिंगोली - 100 टक्के
नांदेड - 92.85 टक्के
बीड - 94.66 टक्के
लातूर - 99.41 टक्के
धाराशिव जिल्ह्यात जवळपास 100 टक्के सर्वेक्षण पूर्ण होत आले आहे.
आकडेवारीत होणार आणखी वाढ
23 जानेवारीपासून सुरू झालेलं मराठा आरक्षणासाठीचे सर्वेक्षण आज 2 फेब्रुवारी मध्यरात्री बारापर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे या आकडेवारीमध्ये वाढ होण्याची शक्यता पाहायला मिळेल. तसेच रात्री 12 नंतर हे सर्वेक्षण पूर्णपणे बंद होईल, असे आदेश राज्य मागासवर्ग आयोगाने सर्व जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना दिलेत. त्यामुळे आज रात्री बारापर्यंत सर्वेक्षण पूर्ण करून उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मागासवर्ग आयोगाला सादर करायचे आहे.
यंत्रणा युद्धपातळीवर कामाला
हे सर्वेक्षण करत असताना राज्यातील महसूली यंत्रणा आणि महानगरपालिकेची यंत्रणा युद्ध पातळीवर कामाला लागली होती. जवळपास साडेचार लाख प्रगनक यामध्ये काम करत होते. तर 200 हून अधिक डेटाबेस सेंटर सुरू होते. सर्वेक्षणासाठी खास सॉफ्टवेअरही तयार करण्यात आलेलं आहे.दोन फेब्रुवारीला मध्यरात्री बारा वाजता हे सर्वेक्षण संपत आहे. त्यामुळे मागासवर्ग आयोगाच्या हातामध्ये राज्यातील सर्वच डेटा उपल्ब्ध होईल. यावरून अहवाल तयार केला जाईल आणि तो राज्य सरकारला सादर केला जाईल. त्यानंतर राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणासंदर्भात कसं आरक्षण द्यायच यावर निर्णय घेणार आहे. त्यामुळे या माहितीच्या आधारे मराठा आरआरक्षणासाठी राज्य सरकार नवीन कायदा आणणार की आणखी काही पर्याय निर्माण करणारं हे पाहण महत्वाचं राहिल.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
