एक्स्प्लोर
Voter List Row: 'उबाटा ७५-८५ नगरसेवकांपलिकडे जात नाही', भाजपचे Keshav Upadhye यांचा हल्लाबोल
ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या 'निर्धार मेळाव्या'वरून आणि मतदार यादीतील (Voter List) कथित घोटाळ्यावरून राजकारण तापले आहे. 'मुंबईच्या सातबाऱ्यावर आपलंच नाव आहे अशा तोऱ्यात वावरणाऱ्या उबाटाला प्रत्यक्षात मुंबईकरांनीच घरातून दारात आणून ठेवलंय', असा हल्लाबोल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी केला आहे. सोमवारी होणाऱ्या शिवसेना निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरे मुंबई मतदार यादीतील घोटाळा एका सादरीकरणातून उघड करणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत बोगस मतदान होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यावी, यावरही ते माहिती देणार आहेत. यावर टीका करताना उपाध्ये यांनी म्हटले आहे की, कितीही वल्गना केल्या तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट कधी ७५ ते ८५ नगरसेवकांपलिकडे जात नाही. त्यामुळे मुंबई आमचीच म्हणणाऱ्यांना मुंबईकरांनी त्यांची जागा दाखवली आहे, असेही ते म्हणाले.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















