एक्स्प्लोर
मराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण द्या : मराठा क्रांती मोर्चा
राज्यातील सर्व विभागांमध्ये अशाप्रकारे संवाद यात्रा काढून आरक्षणाच्या मागणीसाठी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न यात्रेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
पुणे : मराठा समाजाला स्वतंत्रपणे दिलेलं आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकत नाही, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात येत आहे.
मराठा क्रांती मोर्चाकडून विभागीय स्तरावरील संवाद यात्रेला आजपासून सुरुवात झाली. राज्यातील सर्व विभागांमध्ये अशाप्रकारे संवाद यात्रा काढून आरक्षणाच्या मागणीसाठी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न यात्रेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. पुण्यातील एसएसपीएमएस शाळेच्या मैदानावरुन संवाद यात्रेला सुरुवात झाली.
सासवडमधे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाचा आज शंभरावा दिवस आहे. सासवडमधील सभेनंतर ही सभा बारामतीला पोहचणार आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाज मागास असल्याचं म्हटलं असलं, तरी स्वतंत्र आरक्षण देण्याची शिफारस करण्यात आली आहे.
स्वतंत्रपणे दिलेलं आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकत नाही असा आतापर्यंतचा अनुभव असल्याने ओबीसींमध्ये समावेश करुन आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी या संवाद यात्रेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. मराठा आणि कुणबी हे वेगळे असल्याचं राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात म्हटल्यालाही संवाद यात्रेच्या माध्यमातून आक्षेप घेण्यात येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement