एक्स्प्लोर
Advertisement
बसच्या सीटमुळे पँट फाटली, पुणे पोलिसात तक्रार
बसमधून प्रवास करताना तुटलेल्या सीटमुळे पँट फाटल्याने, पोलिसांकडे तक्रार देण्याचा प्रकार पुण्यात घडला आहे.
पुणे: पुणे तिथे काय उणे हे बोलून बोलून गुळगुळीत झालेली म्हण आहे. मात्र खरोखरच पुण्यात कधी काय घडेल हे सांगता येत नाही.
बसमधून प्रवास करताना तुटलेल्या सीटमुळे पँट फाटल्याने, पोलिसांकडे तक्रार देण्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. संजय शितोळे असं तक्रार देण्याऱ्या व्यक्तीचं नाव असून, ते मेकॅनिकल इंजिनिअर आहेत.
संजय शितोळे हे हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करतात. ते प्रवासी नागरी मंच या प्रवासी संघटनेचे सक्रीय कार्यकर्ते आहेत.
बिबवेवाडीला राहणारे संजय शितोळे कात्रजमार्गे हिंजवडीला जाण्यासाठी पीएमपीएमएलच्या स्वारगेट ते जांभूळवाडी या बसमध्ये चढले. मात्र बसमधील ज्या सीटवर ते बसले होते, त्या सीटची धातूची पट्टी उचकटली होती. त्यामुळे शितोळे यांची पँट फाटली.
त्यामुळे शितोळे यांनी बस थांबवली आणि कात्रजच्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये पीएमपीएमएल प्रशासनाविरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी दखलपात्र गुन्हा नोंद केला आहे.
पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पीएमपीएमएल मधून प्रवास करताना सामान्यांना कसा त्रास होतो आणि या बसेसची कशी दुर्दशा झाली आहे हे चव्हाट्यावर यावं यासाठी आपण ही तक्रार दिल्याचं संजय शितोळे यांचं म्हणणं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
क्रिकेट
Advertisement